Ameesha Patel Case: ‘गदर 2’ च्या रिलीजआधी तोंड लपवून कोर्टात पोहचली अमिषा पटेल; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Ameesha Patel Case: ‘गदर 2’ च्या रिलीजआधी तोंड लपवून कोर्टात पोहचली अमिषा पटेल; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Ameesha Patel Surrende : ‘गदर-2’ मुळे सध्या जोरदार चर्चेत असलेली बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) हिने शनिवारी रांची दिवाणी न्यायालयात आत्मसमर्पण केले आहे. कोर्टाने अमिषा पटेलला 21 जून रोजी पुन्हा प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. रांची दिवाणी न्यायालयाने (Ranchi Civil Court) अमिषाच्या विरोधात वॉरंट जारी केले होते. त्यानंतर अमिषा पटेल ही आता कोर्टामध्ये हजर झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)


2017 च्या फसवणूक प्रकरणामध्ये अमिषाने कोर्टात आत्मसमर्पण केले आहे. कोर्टात हजर झाल्यावर अमिषा पटेलला 21 जूनपर्यंत सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यामध्ये रांची दिवाणी न्यायालयाने बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिचा व्यावसायिक भागीदार क्रुणाल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि चेक बाऊन्स प्रकरणात वॉरंट जारी करण्यात आले होते.

तक्रारदार अजय कुमार सिंग यांनी अमिषा पटेल आणि तिच्या साथीदाराविरुद्ध फसवणूक, धमकावणे आणि चेक बाऊन्स या प्रकरणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी अमिषा पटेल दिवाणी न्यायालयात हजर झाली आहे. न्यायालयाने अमिषा पटेलला 10 हजारांच्या दोन जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. एप्रिलमध्ये झालेल्या सुनावणीच्या दरम्यान कोर्टाने तिला समन्स बजावून हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, तेव्हा अमिषा पटेल हजर राहिली नव्हती. त्यानंतर न्यायालयाने हे वॉरंट जारी केले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

2017 हरमू हाऊसिंग कॉलनीमध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान झारखंड येथील सिनेमा निर्माते अजय कुमार सिंह हे अमीषा पटेलला भेटले होते. त्यावेळी अजय कुमार सिंह यांना चित्रपटांमध्ये पैसे गुंतवण्याच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. अजय कुमार यांच्या आरोपांनुसार, त्यांनी देसी मॅजिक हा सिनेमा बनवण्याच्या नावाखाली अमिषा पटेलच्या खात्यात अडीच कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. अजय कुमार सिंग हे लव्हली वर्ल्ड एंटरटेनमेंटचे मालक आहेत. सिनेमा न बनवल्याने आणि पैसे परत न मिळाल्याने अजय कुमार सिंह यांनी कनिष्ठ न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

अमिषा पटेल हिने आपली फसवणूक केल्याचे अजय कुमार यांनी तक्रारीत सांगितले होते. सिनेमा बनला नाही म्हणून अजय कुमार सिंह यांनी अमिषाला पैसे परत मागितले आहे. यानंतर अमिषाने अजय कुमार सिंह यांना चेक दिला होता, मात्र तो बाऊन्स झाला. अजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, अमिषा पटेल आणि तिच्या व्यावसायिक भागीदाराने हा सिनेमा पूर्ण झाल्यानंतर व्याजासह पैसे परत करणार असल्याचे सांगितले होते. देसी मॅजिकचे शूटिंग 2013 मध्ये सुरू झाले होते.

मात्र हा सिनेमा अद्याप प्रदर्शित झाला नाही. जेव्हा सिनेमा निर्मात्याने अमिषा पटेलकडे त्याचे पैसे मागितले, तेव्हा तिने त्याला परत केले नाही. बऱ्याच कालावधीनंतर अमिषाने ऑक्टोबर २०१८ मध्ये अजय कुमार यांना २.५ कोटी आणि ५० लाख रुपयांचे दोन चेक दिले, जे बाऊन्स झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube