Download App

मुंडेंचा वनवास संपला तर फडणवीसांच्या अर्थ विभागाची जबाबदारी करीर यांना

Maharashtra IAS Transfer : राज्य सरकारने मंगळवारी दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे आदेश जारी केले आहेत. अनेक दिवसांपासून पोस्टिंग नसलेले धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंडे यांना पोस्टिंग देण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे कृषी व पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

गेल्या 16 वर्षांत त्यांच्या 20 बदल्या झाल्यानंतर मागच्या बदलीनंतर त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती मात्र अखेर त्यांचा वनवास संपला आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी त्यांची बदली आरोग्य संचालक म्हणून केली होती. पण याठिकाणी देखील कामाच्या हजेरी आणि नोकरीच्या ठिकाणी निवास या दोन मुद्यावरून डॉक्टर संघटनेशी वाद झाले. त्याचबरोबर राज्यातील आरोग्य केंद्रावर धाडी टाकण्याचा निर्णय खुद्द आरोग्यमंत्री तानाजी सावंत याना मान्य झाला नाही. यामुळे त्यांना या पदावरुन दूर करण्यात आले. तेव्हापासून मुंडे हे कोणत्याही पदावर नव्हते.

तुकाराम मुंडेंना अखेर मिळाली पोस्टिंग, कृषी व पशूसंवर्धन खात्याची जबाबदारी

दुसरीकडे डॉ. नितीन करीर यांची अर्थ विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. सध्या ते अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, महसूल आणि वन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. ही सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. कारण त्यांची बदली अर्थ विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

करीर यांना देण्यात आलेला हा विभाग अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खत्यारित येतो. त्यामुळे राज्याचा कणा असलेलं हे अर्थ खात आणि सरकारवर पकड असलेले अर्थमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे खात असल्याने डॉ. नितीन करीर यांची या विभाताल झालेली बदली महत्त्वाची मानली जात आहे.

Tags

follow us