तुकाराम मुंडेंना अखेर मिळाली पोस्टिंग, कृषी व पशूसंवर्धन खात्याची जबाबदारी

तुकाराम मुंडेंना अखेर मिळाली पोस्टिंग, कृषी व पशूसंवर्धन खात्याची जबाबदारी

Maharashtra IAS Transfer : राज्य सरकारने मंगळवारी दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे आदेश जारी केले आहेत. अनेक दिवसांपासून पोस्टिंग नसलेले धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंडे यांना पोस्टिंग देण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे कृषी व पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आपल्या कडक शिस्तीमुळे प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंडे याना अखेर पोस्टिंग मिळाली आहे. प्रत्येक ठिकाणी पदावर असताना राजकिय नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी मुंडे यांचा कायम संघर्ष झाला आहे. सोलापूर, नाशिक, नवी मुंबई या महापालिकांमध्ये लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी संघटना यांच्यात मुंडेविषयी संघर्ष टोकाला गेला. राजकीय सोय म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांची बदली झाली. काही काळ त्याना आरोग्य विभागातील एड्स नियंत्रण मंडळ, तर काही दिवस मानवाधिकार आयोग अशा साईड पोस्टिंगला त्यांची रवानगी करण्यात आली होती. अनेक दिवसांनंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांची बदली आरोग्य संचालक म्हणून केली होती. पण याठिकाणी देखील कामाच्या हजेरी आणि नोकरीच्या ठिकाणी निवास या दोन मुद्यावरून डॉक्टर संघटनेशी वाद झाले. त्याचबरोबर राज्यातील आरोग्य केंद्रावर धाडी टाकण्याचा निर्णय खुद्द आरोग्यमंत्री तानाजी सावंत याना मान्य झाला नाही. यामुळे त्यांना या पदावरुन दूर करण्यात आले. तेव्हापासून मुंडे हे कोणत्याही पदावर नव्हते. अखेर त्यांना कृषी आणि पशसंवर्धन या विभागात बदली मिळाली आहे. यात कृषी विभाग हा अब्दुल सत्तर तर पशूसंवर्धन हा विभाग राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहेत. अब्दुल सत्तर बेधडक बोलण्यात प्रसिद्ध आहेत. तर विखे कडक शिस्तीचे पण मवाळ मानले जातात अशा दोन्ही नेत्याबरोबर आता तुकाराम मुंडे याना काम करावे लागणार आहे.

याचबरोबर शिर्डी संस्थानला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. पी. शिवशंकर हे शिर्डी संस्थानचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असतील
.
मला आता राजकारण सोडायचंय, शरद पवारांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं…

जी श्रीकांत हे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत. तर डॉ. नितीन करीर यांची वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. सध्या ते अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, महसूल आणि वन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डी.टी.वाघमारे यांची गृहविभागाच्या PS (A&S) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

आणखी एक विमान कंपनी दिवाळखोरीत! रोकड संपल्याने सर्व उड्डाणे रद्द

तर राधिका रस्तोगी यांची अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची महापारेषण विभाागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून तुकाराम मुंडे नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य कर विभागाचे छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त असणारे जी. श्रीकांत हे आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असणार आहेत. नागपूर येथील टेक्सटाईलचे संचालक पी.शिव शंकर यांची साईबाबा संस्थान ट्रस्ट्रचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube