मला आता राजकारण सोडायचंय, शरद पवारांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं…
मला आता राजकारण सोडायचं असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मला दोन दिवसांपूर्वीच दिले होते, असा दावा ज्येष्ठ निखिल वागळे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वागळे यांनी हा दावा केलाय. दरम्यान, शरद पवारांनी आज निवृत्तीबाबत घोषणा केल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडालीय. त्यावर वागळेंनी भाष्य केलंय.
मोठी बातमी, कॉंग्रेसचे DK Shivakumar यांच्या हेलिकॉप्टरला अपघात
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे म्हणाले, माझी आणि शरद पवारांची 30 एप्रिल रोजी भेट झाली. शरद पवार पुस्तक प्रेमी असल्याने मी त्यांना पुस्तक भेट देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्यांची आणि माझी जवळपास अर्धा तास चर्चा सुरु होती. त्याचवेळी त्यांनी मला राजकारणातून विड्रॉ व्हायचं असल्याचं सांगितलं, असल्याचं वागळेंनी स्पष्ट केलंय.
सुदानमधील संघर्षादरम्यान 1 लाखांहून अधिक लोकांचे शेजारच्या देशांमध्ये स्थलांतर
तुम्ही दहा वर्षांपूर्वीच याबाबत वक्तव्य केलं होतं पण तसं घडलं नसल्याचं प्रत्युत्तर वागळेंनी त्यांना केलं. त्यावर पवारांनी दोन दिवसांपूर्वीच मला राजकारणात निवृत्ती घ्यायची असून वेगळ्या पद्धतीने समाजकार्य करायचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवारांचं हे वक्तव्य एवढं गांभीर्याने घेतलं नसल्याचं निखिल वागळेंनी सांगितलंय, मात्र, आज राजीनाम्याबाबत शरद पवारांनी घोषणा केल्याने शरद पवारांनी हे पाऊल विचारपूर्वक उचललं असल्याचंही वागळे म्हणाले आहेत. शरद पवारांचं ते वक्तव्य आता मला समजत असल्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह दुसऱ्या फळीतील नेते, युवक कार्यकर्त्यांनी केली आहे. पवारांचा या निर्णयाने राज्याच्या राजकारणाबरोबर देशातील राजकारणामध्ये खळबळ उडाली. त्यानंतर राजीनाम्यावर विचार करायला दोन-तीन दिवस द्या, असा निरोप शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.