मोठी बातमी, कॉंग्रेसचे DK Shivakumar यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

मोठी बातमी, कॉंग्रेसचे DK Shivakumar यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

Helicopter accident of Congress state president DK Shivakumar : सध्या कर्नाटक राज्यात निवडणुकीची (Elections in the state of Karnataka) रणधुमाळी सुरू आहे. यातच कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे एका हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मंगळवारी दुपारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावर त्यांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आली. हेलिकॉप्टरच्या कॉकपिट खिडकीवर घार आदळल्याने हा अपघात झाला आहे.

कर्नाटकमध्ये 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि भापज दोन्ही पक्ष या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. काँग्रेस कमबॅक करण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीत काँग्रेसने पूर्ण ताकद लावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डीके शिवकुमार कोलार जिल्ह्यातील मुलबागल येथे जाहीर सभेसाठी जात होते. या घटनेनंतर शिवकुमार यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. मुलबागलला जात असतांना आमच्या हेलिकॉप्टरच्या अपघात झाला, त्यात आम्ही थोडक्यात बचावलो आहोत. सर्व लोकांच्या शुभेच्छांबाबत धन्यवाद, मी सुरक्षित आहे. इमर्जन्सी लॅंडिंगसाठी त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल मी वैमानिकाचे आभार मानतो. आता रस्त्याने मुलबागलला जात आहे, असं ट्विट त्यांनी केलं.

शिवकुमार यांच्या जवळच्या सुत्रांनी सांगितले की, हेलिकॉप्टरने बंगळुरच्या जक्कूर विमानतळावरून उड्डाण केले होते. हेलिकॉप्टर हवेत असतांना एक घार त्याच्यावर आदळली. यामुळं कॉकपिटची काचही फुटली. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरवावे लागले. शिवकुमार आणि पायलट यांच्यासोबत कन्नड वृत्तवाहिनीचा एक रिपोर्टर होता, जो हेलिकॉप्टरमध्ये त्यांची मुलाकत घेत होता. शिवकुमार यांच्या सह हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुरक्षित आहेत.

राजीनाम्यावर विचार करायला दोन-तीन दिवस द्या; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना निरोप

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी फक्त एक आठवडा शिल्लक आहे. 10 मे रोजी एकाच टप्यात मतदान होणार आहे. त्याचा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे. कर्नाटक निवडणुकीत 2,613 उमेदवारांपैकी 2,424 पुरू,, 184 महिला आणि 2 इतर आहेत. भाजपकडून 224, कॉंग्रेसकडून 223, जेडीएसचे 207, आम आदमी पार्टीचे 209, बसपचे 133, सीपीआय, 8 जेडीयू आणि 2 एनपीपीचे उमेदवार आहेत. या व्यतिरिक्त नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्षांचे 685 उमेदवार आणि 918 अपक्ष उमेदवार आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube