Video : राजीनाम्यावर विचार करायला दोन-तीन दिवस द्या; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना निरोप

  • Written By: Published:
Video :  राजीनाम्यावर विचार करायला दोन-तीन दिवस द्या; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना निरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. पवारांच्या अचानक या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह दुसऱ्या फळीतील नेते, युवक कार्यकर्त्यांनी केली आहे. पवारांचा या निर्णयाने राज्याच्या राजकारणाबरोबर देशातील राजकारणामध्ये खळबळ उडाली.

त्यानंतर अनेक नेते पुन्हा शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आम्ही शरद पवार यांच्याशी बोलून त्यांनी सांगितलं आहे की,  “माझा निर्णय मी दिला आहे, पण माझा निर्णय घ्यायला दोन-तीन दिवस लागतील. तेवढा वेळ मला द्या.” अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

कुटुंबाला सांगूनच पवारांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

ते कार्यकर्त्यांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, ” तोपर्यंत इथे असे बसलेल्या लोकांनी इथून उठले पाहिजे जर तुम्ही असे बसलेले दिसला तर माझा निर्णय बदलणार नाही, सगळ्यांनी घरी जावा आणि जेवण करून घ्या.” असं देखील त्यांनी सांगितलं आहे असं अजित पवार यांनी सांगितलं.

उस्मानाबाद, बुलढाणा जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याचं जाहीर केलं आहे पण पवार साहेबानी सांगितलं आहे की राजीनामा देण्याचं कारण नाही. कोणीही राजीनामा द्यायची गरज नाही. असं देखील शरद पवारांनी सांगितलं आहे. शिवाय आता जे कोणी राजीनामा देतील त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. हा प्रश्न राष्ट्रवादी परिवाराचा आहे, त्यामुळे कोणीही अडचणी वाढतील असं काहीही कोणी करू नये, असं मत अजित पवार यांनी मांडल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube