Download App

मोठी बातमी! विरोधकांच्या विरोधाला न जुमानता जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेत मंजूर

विधान परिषदेत याला जोरदार विरोध झाला. विरोधकांनी अखेरच्या क्षणी सभा त्यागही केला. त्यानंतर या गदारोळात विधेयक मंजूर.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Jansurksha Bill : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत जनसुरक्षा विधेयक सादर केलं होतं. हे विधेयक सादर केल्यानंतर यावर विधानसभेत चर्चा झाली. चर्चेनंतर ते आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं. (Jansurksha) यानंतर हे विधेयक आज विधान परिषदेत सादर करण्यात आलं. विधान परिषदेत याला जोरदार विरोध झाला. विरोधकांनी अखेरच्या क्षणी सभा त्यागही केला. त्यानंतर या गदारोळात सत्ताधारी भाजपकडून हे विधेयक मंजूर करण्यात आलं.

उद्धव ठाकरे यांची टीका 

माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल आणि आज विधिमंडळात जनसुरक्षा कायदा आणला. सत्ताधारी पक्षाकडे बहुमत आहे पण त्याचा दुरुपयोग करण्यात येत आहे. आता कडवी डाव्या विचारसरणीचे असे शब्द पहिल्यांदा ऐकायला मिळत आहे. आपल्या संविधानामध्ये  सर्व समावेशकता आहे. डावी आणि उजवी असे काही नाही. दहशतवादाचा विरोध असेल तर आम्ही सरकारसोबत राहणार पण या विधेयकामध्ये कुठंही नक्षलवाद असा उल्लेख नाही. त्यामुळे यातून राजकीय वास येत आहे. या विधेयकामध्ये दहशतवाद आणि नक्षलवाद  शब्द नाही. असं माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.

जनसुरक्षा कायदा आणला जात आहे. बहुमताच्या जोरावर हा कायदा आणला जात आहे. सांगताना सरकार सांगहत आहे की नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे. पण कायद्यात नक्षलवाद असा उल्लेख नाही. विधेयकात कडव्या डाव्या विचारसरणी असा उल्लेख आहे. देशविघातक शक्तीचा बिमोड करण्यासाठी आम्ही सरकारसोबत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पण तुम्ही राजकीय हेतून विधेयक आणत आहात. यामध्ये राजकीय दुरुपयोगाचा वास येत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कुणालाही कधीही ताब्यात घेतलं जाऊ शकतं असे उद्धव ठाकरे म्हणाले. या बिलामध्ये नक्षलवादाचा उल्लेख येणं गरजेचं असल्याचे ठाकरे म्हणाले. या कायद्याचा राजकीय दुरुपयोग केला जाईल असे ठाकरे म्हणाले.

शेंडा बुडका नसलेलं विधेयक

जो कोणी भाजपविरोधात बोलेल तो देशद्रोही आहे असं त्यांना वाटत असेल तर ते विकृत मानसिकतेचे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. रस्त्यावर कोणी उतरु नये म्हणू हा कायदा आणल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. हे विधेयक शेंडा बुडका नसलेलं आहे. जनसुरक्षेच्या नावाखाली तुम्ही उद्या कोणालाही आत टाकाल असे उद्धव ठाकरे म्हणाले. कडवे डावे म्हणजे काय? असा सवाल देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

follow us

संबंधित बातम्या