Video : जन सुरक्षा विधेयक : कधीही अन् कुठूनही मुसक्या आवळू शकणारं बिल; ठाकरेंनी जनतेला केलं सावध

Video : जन सुरक्षा विधेयक : कधीही अन् कुठूनही मुसक्या आवळू शकणारं बिल; ठाकरेंनी जनतेला केलं सावध

Uddhav Thackeray : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात राज्य सरकारकडून जनसुरक्षा विधेयक (Public Safety Bill) मांडण्यात आले आहे. राज्य सरकारने 10 जुलैला विधानसभेत तर आज 11 जुलैला विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयक मांडले आहे. तर दुसरीकडे या विधेयकाला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोध करत हा जनसुरक्षा कायदा नाहीतर भाजप सुरक्षा कायदा असल्याचा टोला राज्य सरकारला लावला आहे. शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जनसुरक्षा कायद्यावरुन भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे.

माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल आणि आज विधिमंडळात जनसुरक्षा कायदा आणला. सत्ताधारी पक्षाकडे बहुमत आहे पण त्याचा दुरुपयोग करण्यात येत आहे. आता कडवी डाव्या विचारसरणीचे असे शब्द पहिल्यांदा ऐकायला मिळत आहे. आपल्या संविधानामध्ये  सर्व समावेशकता आहे. डावी आणि उजवी असे काही नाही. दहशतवादाचा विरोध असेल तर आम्ही सरकारसोबत राहणार पण या विधेयकामध्ये कुठेही नक्षलवाद असा उल्लेख नाही. त्यामुळे यातून राजकीय वास येत आहे. या विधेयकामध्ये दहशतवाद आणि नक्षलवाद  शब्द नाही. असं माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.

आमदार संजय गायकवाडवर कारवाईस दिरंगाई, नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

माध्यमांशी पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ताडाचा दुरपयोग केला गेला. आमच्याकडे ये नाही तर तुरूंगात टाकेल असा ताडाचा उपयोग करण्यात आला होता. पहलगाममध्ये धर्म विचारुन गोळ्या घातल्या पण अद्याप पकडले गेले नाही. जनसुरक्षा बिल म्हणजे भाजप सुरक्षा कायदा आहे जो भाजप विरोधात बोलेल त्याला आत घाला असा टोला देखील माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला लावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube