Download App

फडणवीसांनी रस्त्यातच विचारलं भाजपात येता का? राणेंनी सांगितला पक्षप्रवेशाचा भन्नाट किस्सा!

Narayan Rane : पू्र्वाश्रमीचे कट्ट्रर शिवसैनिक नंतर काही काळ काँग्रेसमध्ये पुढे भाजपप्रवेश करत केंद्रात मंत्रिपद पटकावलं त्या नारायण राणे यांचं (Narayan Rane) एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस मागे (Devendra Fadnavis) लागल्याने भाजपात प्रवेश केला. फडणवीसांनी रस्त्यात थांबवून मला भाजपप्रवेशाबाबत विचारलं होतं. त्यानंतर विचारपूर्वक मी हा निर्णय घेतला असे नारायण राणे म्हणाले. राणे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राणेंनी हा किस्सा सांगितला.

नारायण राणेंना तिसऱ्यांदा पराभूत करणार, अडीच लाखांच्या फरकाने आपटणार; विनायक राऊतांचं चॅलेंज

राणे पुढे म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचे की मुलीचे लग्न होते. त्यावेळी मी निघालो होतो. रस्त्यात असतानाच देवेंद्र फडणवीसांनी मला एक मिनीट बोलायचे आहे असे सांगितले. ते म्हणाले दादा पक्षात या. मी म्हटलं देवेंद्र तू एका पक्षाचा नेता आहेस असं रस्त्यावर कसं काय विचारतोस. तू मला बोलाव मी येतो काय तो निर्णय चर्चा करून घेऊ. त्यानंतर या मुद्द्यावर आमची चर्चा झाली आणि मी भारतीय जनता पार्टीत प्रवेशाचा निर्णय घेतला.

निर्णय घेताना मी नेहमी विचार करतो त्यानंतर काय तो निर्णय घेतो. भाजपात प्रवेश करण्याआधी मी विचार केला त्यानंतरत भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे नारायण राणे म्हणाले. यानंतर त्यांनी भाजप सरकारमधील कामकाजाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच माझे मत पंतप्रधान मोदींनाच आहे असे समजून काम सुरू करा असे आवाहन त्यांनी मेळाव्यास उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले. या मेळाव्यास महायुतीमधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशोक चव्हाण यांचा फक्त ट्रेलर, तीन तासांचा पिक्चर बाकी; नितेश राणेंचा मोठा दावा

follow us