Chandrashekhar Bawankule replies Uddhav Thackeray : राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांकडून ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. या सभांतून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर भाजप नेते विशेषतः देवेंद्र फडणवीस आहेत. काल एका सभेत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जहरी टीका केली होती. देवेंद्र फडणवीस नालायक आणि कोडगे आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यांची हीच टीका भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला होता.
पालघर साधू हत्याकांडात ठाकरे मूग गिळून गप्प बसले, १०० कोटी वसुली रॅकेट चालवत कारभार केला, कोविडमध्ये लोक मरत असताना…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) April 20, 2024
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ठाकरेंवर संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचा महानालायक कोण अशी स्पर्धा घेतली तर त्यात उद्धव ठाकरे निर्विवाद पहिलेच येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांच्या सत्ताकाळात नालायकपणाचा कळस गाठला होता. पालघर साधू हत्याकांडात ठाकरे मूग गिळून गप्प बसले.
100 कोटी वसुली रॅकेट चालवत कारभार केला. कोविडमध्ये लोक मरत असताना घोटाळे केले. मृतदेहाच्या बॅगमध्ये मलिदा लाटला. याला कोडगेपणा म्हणतात. देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्रिपदावर बसायचं. मुलाला मंत्रिपद द्यायचं आणि बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडायचं याला कोडगेपणा म्हणतात, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
Uddhav Thackeray : सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करा; ठाकरेंनी कॉंग्रेसला ठणकावलं
लोकसभा निवडणुकीत जनाधार मिळत नसल्यानं उद्धव ठाकरेंनी आता लाज सोडली आणि वाट्टेल ते बडबडत आहेत. तुम्ही कितीही शिव्याशाप द्या. देवेंद्रजींसारख्या सच्चा नेत्याला त्यानं फरक पडणार नाही. पण, येत्या निवडणुकीनंतर जनता तु्म्हाला मात्र कायमचं घरी बसवेल हे नक्की, असे बावनकुळे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर आता ठाकरे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी आयोजित एका जाहीर सभेत उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “आज फडणवीस यांनी मला भ्रमिष्ट म्हणाले ठीक आहे. मी भ्रमिष्ट आहे की नाही जनता ठरवणार मात्र आज तुमची परिस्थिती खूप वाईट आहे, तुम्ही जनाची नाही तर मनाची ठेवा तुम्हाला दोन्ही नाही आहे हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही लाज लज्जा सोडलेले कोडगे माणूस आहात.