Download App

राज ठाकरे-अमित शाहांची बैठक पण, चर्चा उद्धव ठाकरेंची; बैठकीतील ‘2019’ चा किस्सा काय?

Raj Thackeray and Amit Shah Meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? राज ठाकरेंनी किती जागांची मागणी केली? अमित शाह काय म्हणाले? खरंच मनसे महायुतीत येणार का? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. या प्रश्नांची उत्तरे यथावकाश मिळतीलही. परंतु, या बैठकीत नेमकं काय घडलं याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

आता या बैठकीतील काही माहिती समोर ये लागली आहे. या बैठकीत असा एक किस्सा सांगण्यात आला ज्याची चर्चा आता होत आहे. या बैठकीत राज ठाकरे यांनी दोन जागांचा प्रस्ताव मांडला. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन जागा मागितल्या. परंतु, अमित शाह यांनी हा प्रस्ताव फेटाळला. एक जागा नक्की देऊ पण दुसरी जागा देणं अशक्य असल्याचं अमित शाह म्हणाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. लोकसभा निवडणुकीनंतर पुढं कसं जायचं याबाबत माहिती राज ठाकरेंनी विचारली त्यावर आताच काही आश्वासन देणं शक्य होणार नसल्याचं अमित शाहांनी सांगितल्याची माहिती आहे.

राज ठाकरे-अमित शाह बैठकीत काय ठरलं? मनसे नेत्यानं सांगितली ‘अंदर की बात’

या बैठकीत भाजपाचे जुने सहकारी उद्धव ठाकरे यांचाही उल्लेख  (Uddhav Thackeray) निघाला. राज ठाकरे यांनी दोन जागांची मागणी केली. परंतु, शाह यांनी एकच जागा देता येईल असं सांगितलं. तसेच विधानसभेबाबतही कोणतीच कमिटमेंट या बैठकीत दिली नाही. विधानसभा एकत्र लढू पण त्यावेळचं जागावाटप त्यावेळी ठरवू. याआधी 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याबाबत जे झालं त्याची पुनरावृत्ती पुन्हा नको, म्हणून आताच्या घडीला फक्त लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलू, अशी स्पष्ट भूमिका अमित शाह यांनी घेतल्याची माहिती मिळाली आहे.

follow us