राज ठाकरे-अमित शाह बैठकीत काय ठरलं? मनसे नेत्यानं सांगितली ‘अंदर की बात’

राज ठाकरे-अमित शाह बैठकीत काय ठरलं? मनसे नेत्यानं सांगितली ‘अंदर की बात’

Raj Thackeray and Amit Shah Meeting : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर (Lok Sabha Election) काल दिवसभर राज ठाकरे आणि केंद्रीय अमित शाह (Amit Shah) यांची भेट चर्चेत राहिली. यावेळी अमित ठाकरेही उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांत अर्धा तासापेक्षा जास्त वेळ चर्चा सुरू होती. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची उत्सुकता होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे आणि अमित ठाकरे काल दिल्लीला गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबर बैठक घेतली. आज ते मुंबईत पोहोचले. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. याबाबत आता दोन ते तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, या बैठकीत राज ठाकरे यांनी दोन जागांचा प्रस्ताव मांडला. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन जागा मागितल्या. परंतु, अमित शाह यांनी हा प्रस्ताव फेटाळला. एक जागा नक्की देऊ पण दुसरी जागा देणं अशक्य असल्याचं अमित शाह म्हणाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. लोकसभा निवडणुकीनंतर पुढं कसं जायचं याबाबत माहिती राज ठाकरेंनी विचारली त्यावर आताच काही आश्वासन देणं शक्य होणार नसल्याचं अमित शाहांनी सांगितल्याची माहिती आहे.

Loksabha Election : मनसेचे इंजिन महायुतीला जोडणार ? राज ठाकरे तातडीने दिल्लीला 

नांदगावकर म्हणाले, राज ठाकरे मुंबईत आल्यानंतर मी आणि अविनाश जाधव यांनी त्यांची भेट घेतली. अमित शाह यांच्याबरोबरील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. आता येत्या दोन ते चार दिवसांत निर्णय घेतला जाईल. निवडणुकीसाठी किती जागा मनसेने मागितल्या असा प्रश्न विचारला. त्यावर नांदगावकर म्हणाले, मी आताच याबाबत सांगू शकत नाही. परंतु, पक्षाकडून ज्या काही जागा मागितल्या गेल्या आहेत त्यावर फलदायी अशी चर्चा झाली आहे.

दक्षिण मुंबई मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा आहे. महायुतीत आल्यानंतरही मनसे या मतदारसंघासाठी आग्रही राहिल असे सांगितले जात आहे. यावर नांदगावकर म्हणाले, कुणाला कुठून उमेदवारी मिळेल हे पक्ष ठरवेल. जे पक्ष नेतृत्वाला वाटतं तेच पक्षात घडतं. माझ्या इच्छेचा काहीच प्रश्न राहत नाही, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

Bihar Politics : बिहारमध्ये NDA ला धक्का! जागावाटपानंतर केंद्रीय मंत्र्यांचा थेट राजीनामा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube