Download App

फडणवीस-ठाकरेंच्या भेटीनंतर सभागृहात काय चर्चा; शंभुराज देसाईंनी हसत हसत सांगितलं

Devendra Fadnavis Uddhav Thackeray Visit : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विधानभवन परिसरातील भेटीची चर्चा दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले गेले, दोघे नेते कुणाला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत, याचाही अंदाज ज्याने त्याने आपल्या पद्धतीने घेतला. तसेच या भेटीत दोघेजण काय बोलले असतील याचीही चर्चा येथे रंगली आहे. ही चर्चा काय असेल हे जाणून घेण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावर मंत्री  देसाई यांनी  मात्र अत्यंत मिश्कील टिप्पणी केली.

वाचा : ठाकरे अन् फडणवीसांच्या भेटीनं शिंदे गट अस्वस्थ? मंत्री शंभुराज देसाई म्हणाले..

देसाई म्हणाले, की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव  ठाकरे भेटले त्यावेळी आम्ही सभागृहात होतो. आम्हालाही  ते दृश्य पहायला बरं वाटलं असतं. या दोघांच्या भेटीत काय चर्चा झाली हे माहिती नसले तरी बहुधा फडणवीस ठाकरेंना म्हणाले असतील, की आता शिवसेना शिंदेंचीच आहे. निवडणूक आयोगाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्ष दिलाय, चिन्हही दिलयं तेव्हा आता एकनाथ शिंदेंबरोबर काम करा, असे उद्धव ठाकरेंना सांगितले असेल अशी चर्चा विधानभवनाच्या परिसरात ऐकली.

या भेटीनंतर शिंदे गटाच्या आमदारांत अस्वस्थता असल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रश्नावरही मंत्री देसाईंनी उत्तर दिले. ते म्हणाले, तुम्हाला आमच्यात कुठे अस्वस्थता जाणवली. आम्हाला काहीच काळजी वाटत नाही. उलट महाविकास आघाडीचे नेते तारीखवर तारीख देऊन थकले आहेत. आता तर अधिवेशन संपत आले  आहे.  तरी देखील सरकार पडले नाही. एकनाथ शिंदे आणि  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील हे सरकार भक्कम आहे. आम्ही एकविचाराने काम करतोय त्यांचे काही लोक आमच्या संपर्कात आहेत.  त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आहेत, असा टोल त्यांनी लगावला.

राष्ट्रवादीने घेरलेल्या भुसेंच्या मदतीला शंभूराज देसाई; राऊतांनाही दिले चॅलेंज..

सत्ता असताना हिंमत का केली नाही 

राज ठाकरे यांनी मेळाव्यातील भाषणात माहिमच्य समुद्रातील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर सरकारने  तत्काळ कारवाई करत हे बांधकाम काढून घेतले. यावर देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शिंदे फडणवीस सरकार चुकीचे कधीच सहन करत नाही. तत्काळ कारवाई केली गेली. त्यालाही धाडस लागते. गतिमानता लागले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तर हिंदुत्वाचा विचार करणारे मुख्यमंत्री होते ना.  मग जाता येता त्यांना हे कसं दिसलं नाही. 2007 मध्ये सामनामध्येही यासंदर्भात छापले होते ना मग सत्ता असतानाही बांधकाम  का पाडले नाही, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Tags

follow us