‘आधी स्वतःच्या पाठीमागे किती आमदार हे पाहा’; देसाईंनी चव्हाणांना सुनावलं

Satara News : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी चव्हाणांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे 50 आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीमागे किती आमदार […]

Chavan And Desai

Chavan And Desai

Satara News : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी चव्हाणांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे 50 आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीमागे किती आमदार आहेत. याचे त्यांनी आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

…नाव घेतलं नव्हतं, कोणाच्या अंगाला का लागावं, अजित पवारांचा राऊतांना टोला

काय म्हणाले चव्हाण ?

पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथे पत्रकार परिषदेत भाजपबरोबर जाणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. तरी देखील वावड्या उठवल्या जात आहेत. कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी तर कधी माझ्याबद्दलही अशा वावड्या उठवल्या गेल्या. या चक्रातून भाजपला बाहेर पडायचे असून नव्या लोकांना पक्षात घेतले जाऊ शकते. यासाठी मुख्यमंत्र्यांचा बळी जाऊ शकतो. मुख्यमंत्र्यांना दुधातल्या माशीसारखे फेकून द्यायचे हे काही बरोबर नाही. या पदाचा मान राखला गेलाच पाहिजे, असे सांगितले होते.

ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरेंची हकालपट्टी; शिंदेंसोबत जाणार

चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर मंत्री देसाई यांनी त्यांना आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. चव्हाण यांनी त्यांच्या मागे किती आमदार आहेत हे पहावे. जो नेता 50 आमदार आणि 13 खासदार आपल्यासोबत ठेवतो. त्यांचे नेतृत्व एकमुखी मान्य केले जाते. त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही. त्यांनी आपल्या पाठीमागे किती आमदार आणि खासदार आहेत हे आधी तपासून पहावे. ते एकदा सांगावे, असे आव्हान दिले.

Exit mobile version