‘हा तर काळाराम मंदिराच्या सनातन्यांचा माजोरडेपणा’ ; आव्हाडांनी झापले !

Jitendra Awhad : नाशिकच्या काळाराम मंदिरात संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना वैदिक म्हणण्यास विरोध करण्यात आला. यानंतर त्यांनी इन्स्टाग्राम पोस्ट लिहीत तीव्र संताप व्यक्त केला होता. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ‘काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा.. छत्रपती […]

Jitendra Awhad

Jitendra Awhad

Jitendra Awhad : नाशिकच्या काळाराम मंदिरात संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना वैदिक म्हणण्यास विरोध करण्यात आला. यानंतर त्यांनी इन्स्टाग्राम पोस्ट लिहीत तीव्र संताप व्यक्त केला होता. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

‘काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा.. छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावल, छत्रपतींमुळे मंदिरं राहिली त्यांनाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही ?  छत्रपती शिवरायांबरोबर सनातनी मनुवादी असेच वागले. छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली.

‘शाहू महाराजांना शुद्र म्हणाले हेच सनातन मनुवादी आजही छत्रपतींना शुद्र समजतात. बर झाले हे छत्रपतींच्या वारसांबरोबर झाले जे मी सांगत तो हाच सनातनी धर्म. आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतात अजून कुठला पुरावा हवा ? आजचे छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचं काय ? बहुजनांनो डोळे उघडा, हाच तो सनातन धर्म तो तुम्हाला शुद्रच मानतो’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

नेमकं काय घडलं ?

 

नाशिकच्या काळाराम मंदिरात संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना वैदिक मंत्र म्हणण्यास विरोध करण्यात आला. त्याकाळी शाहू महाराजांनी धार्मिक क्रिया पुराणोक्त विधीनुसार न करता वैदिक विधीनुसार करण्याचे आदेश काढले होते. त्यानंतरही मंदिरात हा प्रकार घडल्याने संयोगिताराजे संतापल्या. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीत संतापाला वाट मोकळी करून दिली. या घटनेवर टीका केली.

https://letsupp.com/maharashtra/sambhajirajes-wife-angry-on-kalaram-mandir-incidance-29870.html

काल रामनवमीच्या निमित्ताने संयोगिताराजे यांनी काळाराम मंदिरास भेट दिली. त्यावेळी पूजा करताना महंतांनी ही पूजा पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. याला संयोगिताराजे यांनी विरोध दर्शवत वैदिक मंत्र म्हणण्यास सांगितले.

ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी ? छत्रपतींनी वाचविली. मग छत्रपतींना शिकविण्याचे धाडस करू नका अशा प्रकारे पोस्ट करत त्यांनी मंदिरातील महंतांना खडसावले.

 

 

 

 

 

Exit mobile version