Download App

सर्व्हे कशाला, महाविकास आघाडीच फुटणार; निवडणुकांआधीच शिरसाटांनी उडविली खळबळ!

Sanjay Shirsat : देशात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. महाराष्ट्रातही निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडी पाहता भविष्यात काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण झालेले असतानाच एक सर्व्हे आला आहे. जर लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढल्या तर 48 पैकी 40 ते 45 जागा जिंकता येतील असा निष्कर्ष काँग्रेसच्या या सर्व्हेतून समोर आला आहे. या सर्व्हेची चर्चा सुरू असताना यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत मोठा दावा केला आहे.

‘देवेंद्र फडणवीस’ म्हणून दाखवा, एक लाख देतो’; ठाकरे गटाच्या खासदाराचं राणेंना चॅलेंज!

शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. काँग्रेसच्या या सर्व्हेची त्यांनी खिल्ली उडविली. काँग्रेसची भूमिका जर तुम्ही पाहिली तर ती दररोज बदलत असते. काँग्रेसने आधी सांगितले होते की आमचा फॉर्म्युला तयार आहे. उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे की शरद पवार यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. हा कार्यकर्त्यात संभ्रम नाही तर त्या तिन्ही पक्षातल्या गटातला संभ्रम आहे. म्हणून भविष्यात ही आघाडी टिकणार नाही हे मी वारंवार सांगितले आहे. त्याचा परिणामही आता दिसून येत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाही यांना वेगळ्याच लढाव्या लागणार आहेत, असा खळबळजनक दावा शिरसाट यांनी केला. त्यांच्या या दाव्यावर विश्वास ठेवला तर महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष लवकरच वेगळे होतील असे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची नुकतीच भेट झाली. इंडिया आघाडीच्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार आहेत, याकडे कसे पाहता असे विचारल्यावर शिरसाट म्हणाले, शरद पवार यांनी आधीच जाहीर केलं आहे तरी काका-पुतण्यात वारंवार भांडण का लागलं जात हे मला माहिती नाही. त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष फुटलेला नाही. याचा अर्थ ज्यांना जसा काढायचा त्यांनी तसा काढावा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्नेहभोजनाला अजित पवारांची दांडी, नाराजीच्या चर्चांना उधाण

इंडियाच्या बैठकीचा काहीच परिणाम होणार नाही

इंडियाची बैठक कशी होईल देव जाणो. पण येथील एक गट खूप चिंतन करतोय की जेवण काय द्यायचं. लेफ्टला कोण उभं राहणार राईटला कोण उभं राहणार यासाठी बैठका सुरू आहेत. या अशा बैठका देशभरात जरी झाल्या तरी एनडीएवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही.

Tags

follow us