Download App

मंत्रालयाबाहेर भर उन्हात तोबा गर्दी; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे संतापाची लाट

Mumbai : राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा पडला आहे. दुपारच्या रणरणत्या उन्हात अंगाची लाही होत आहे. अशा परिस्थितीत उष्माघाताचा झटका बसण्याचीही शक्यता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात त्याचा प्रत्यय आलाच आहे. यानंतरही प्रशासन काही शहाणे होताना दिसत नाही.

कडाक्याच्या उन्हाळ्यात अगदी भर दुपारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक मंत्रालयाबाहेर पास घेण्यासाठी तासनतास ताटकळत उभे होते. येथे एक दिवसाचे पास घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती.

Ajit Pawar : ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील आपत्ती सरकार निर्मित, अजित पवारांचं सरकारला पत्र

भर उन्हात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या कडाक्याच्या उन्हात उष्णता प्रचंड वाढली होती. अश परिस्थितीतही नागरिक ताटकळत उभे होते. तरी देखील पास मिळत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

पास का मिळत नाहीत याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे समजले की येथील इंटरनेट बंद पडले आहे. त्यामुळे पास मिळत नसल्याची माहिती मिळाली. या तांत्रिक अडचणींचा फटका मात्र नागरिकांना सहन करावा लागला.

Heatwave : राज्यात उकाड्याने नागरिक त्रस्त, वीजेच्या मागणीत प्रचंड वाढ

दरम्यान, हे नागरिक राज्यातील विविध ठिकाणांहून आज मंत्रालयात कामानिमित्त आले होते. मंत्रालयात जाण्याआधी त्यांना येथे पास काढावे लागतात. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे पास मिळत नसल्याने हे नागरिक येथे तासनतास अडकून पडले. इंटरनेट बंद असल्याने असे होत असल्याची माहिती मिळाली. मात्र ऐन दुपारच्या वेळी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. राज्यातील पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, सोलापूर यांसह अन्य शहरांतून हे नागरिक कामानिमित्त येथे आले होते.

Tags

follow us