Download App

मोठी अपडेट! सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; दोघाजणांना भूजमधून उचलले

Salman Khan House Gun Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील (Salman Khan) गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी अवघ्या 48 तासांच्या आत गोळीबार करणाऱ्या दोन व्यक्तींना गुजरातच्या भूजमधून अटक केली आहे. या दोघांना पुढील तपासासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे. या दोघा जणांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या दोघांनीच सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे.

शनिवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर दुचाकीवरून आलेले दोघु शूटर फरार झाले होते. या गोळीबाराची जबाबदारी घेत लॉरेन्स बिष्णोईच्या भावाने धमकी दिली होती. गोळीबार झाला तेव्हा सलमान खान घरातच होता. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी खबरदारी घेत त्याच्य घराबाहेर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे.

Salman Khan च्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी तीन जण ताब्यात; तपास क्राईम ब्रॅंच करणार

ज्या बंदुकीतू गोळीबार करण्यात आला ती बंदूक 7.6 बोअरची होती, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपींची दुचाकीही आता जप्त केली आहे. या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळीने घेतली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने गोळीबार केल्याचा दावा एका फेसबुक पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेत राहणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

अटक केलेल्यांचे विकी साहब गुप्ता आणि सागर पाल अशी नावे आहेत. या दोघांनी गोळीबाराची कबुली दिली आहे. या दोघांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.  पोलिसांकडून या दोघांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी यासाठी प्रयत्न होतील. दरम्यान, या घटनेत वापरण्यात आलेली दुचाकी एक किलोमीटर अंतरावर आढळून आली. या दुचाकीची नोंद पनवेल येथील एका रहिवाशाच्या नावावर आहे. आता ही दुचाकी चोरीची आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

Salman Khan: ‘टाइगर 3’ स्ट्रीमिंगवर फिल्म हिट होताच, अभिनेत्याने थेट सांगितलं, म्हणाला 

गोळीबार केल्यानंतर दोघेही पनवेलमध्ये थांबले होते. ज्याठिकाणी त्यांनी रुम भाड्याने घेतली होती. त्या घरमालकाचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. खोली भाड्याने देताना करारनामा केला होता का, करारनामा करताना आरोपींनी खरी कागदपत्रे दिली होती का याचा तपास मुंबई पोलिसांकडून केला जात आहे.

follow us