Download App

मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; SIT होणार स्थापन

बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेनं (Badlapur Crime) राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

Badlapur Crime : बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेनं (Badlapur Crime) राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून कठोर कारवाईला (Maharashtra) सुरुवात केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. आता राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) एसआयटी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी रेल्वे रुळावर उतरत आंदोलन केले. त्यामुळे येथे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. आंदोलकांना रेल्वे रुळावरून हटविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. ज्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दुसरीकडे  शाळेचे गेट तोडून आंदोलक आत घुसले. येथे त्यांनी शाळेची नासधूस करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पालकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. संतापलेल्या पालकांनी शाळेबाहेर जोरदार शाळेबाहेर जोरदार आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी शाळेच्या आत घुसून नासधूस करण्यास सुरुवात केली. शाळेतील आंदोलकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराचा मारा केल्याची माहिती मिळाली आहे.

Badlapur Crime : गृहमंत्री मनसेचा असता तर जागेवर एन्काऊण्टर केला असता; मनसेचा संताप

बदलापुरातील या घटनेचं गांभीर्य आणि नागरिकांचा रोष पाहता सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या. कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली. गृहखात्याने या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी नियुक्त केली आहे. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत ही एसआयटी गठीत करण्यात आली आहे. या एसआटीच्या नियुक्तीमुळे घटनेचा तपास अधिक वेगाने होणार असल्याचे सांगण्यात आले.

मुख्य आरोपीला बेड्या

या घटनेनंतर बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. सरकारनेही कारवाईस सुरुवात केली आहे. या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. शाळेनेही माफीनामा सादर केला आहे. शाळेतील मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. मुलांची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. सजग नागरिकांनी या शाळेविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून कठोर कारवाईस सुरुवात केली आहे.

Video: आता बस्स झालं! यांना चिरडून मारा; बदलापूर अत्याचार प्रकरणावर आमदार शिरसाठ संतप्त

follow us