Download App

इंडिया आघाडीचं ठरलं! पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? काँग्रेस नेत्यानं थेट नावच सांगतिलं

Congress : देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे राजकीय पारा वाढला आहे. आधीच तर विरोधी पक्ष किमान समान कार्यक्रम घेऊन मोठ्या मुश्किलीन एकत्र आले आहेत. विरोधकांची (Congress) ही एकता किती दिवस टिकणार अशी चर्चा होत असतानाच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी तर थेट पंतप्रधान पदाचा उमेदवारच जाहीर करून टाकला आहे. त्यांच्या या घोषणेने विरोधी आघाडीत मात्र खळबळ उडाली आहे.

सोनिया गांधी, राहुल गांधी सुट्टीसाठी जम्मू कश्मीरला; श्रीनगरच्या निगेन तलावात लुटला नौकाविहाराचा आनंद

मुंबईत होणाऱ्या बैठकीआधी आघाडीच्या (Congress) उमेदवाराचं नाव जाहीर करून गेहलोत यांनी बार उडवून दिला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी हेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असे गेहलोत यांनी सांगितले. गेहलोत यांनी जरी नाव जाहीर केलं असलं तरी त्यावर आघाडीतील अन्य पक्ष सहमत होतील की नाही याबाबत शंकाच आहे.

गेहलोत यांनी इंडिया टुडे ग्रुपबरोबर बोलताना हा दावा केला. सर्व पक्षांनी (Congress) चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. जनतेने दबाव निर्माण केला ज्यामुळे विरोधी पक्षांची आघाडी तयार झाली आहे. पंतप्रधान मोदींनी अहंकार करू नये कारण, 2014 मध्ये भाजप केवळ 31 टक्के मतांसह आला होता. उर्वरित 69 टक्के मते त्यांच्या विरोधात होती. मागील महिन्यात बंगळुरू येथे इंडिया आघाडीची बैठक झाली तशी भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडी घाबरली आहे.

कार्ती चिदंबरम यांना मोठा दिलासा, सीबीआय-ईडीच्या विरोधानंतरही परदेशात जाण्याची परवानगी

गेहलोत पुढे म्हणाले, ज्यावेळी मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा ते काही करू शकले नाहीत. 2024 च्या निवडणुकीत एनडीए 50 टक्के मतांसह सत्तेत येण्यासाठी काम करत असल्याचा भाजपने केला आहे. मात्र पंतप्रधान मोदी हे कधीच साध्य करू शकणार नाहीत. त्यांच्या मतांची टक्केवारी कमी होईल आणि पंतप्रधान कोण होणार हे 2024 च्या निवडणुकीचे निकाल निश्चित करतील.

Tags

follow us