सोनिया गांधी, राहुल गांधी सुट्टीसाठी जम्मू कश्मीरला; श्रीनगरच्या निगेन तलावात लुटला नौकाविहाराचा आनंद

सोनिया गांधी, राहुल गांधी सुट्टीसाठी जम्मू कश्मीरला; श्रीनगरच्या निगेन तलावात लुटला नौकाविहाराचा आनंद

श्रीनगर : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नियमित राजकीय कार्यक्रमांमधून ब्रेक घेतला आहे. ते काही दिवसांच्या सुट्टीसाठी जम्मू-कश्मीरला गेले आहेत. श्रीनगरला पोहोचल्यानंतर निगेन तलावात या दोघांनी नौकाविहाराचा आनंदही लुटला. दरम्यान, पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, प्रियंका गांधी वड्रा आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हेही त्यांच्यासोबत लवकरच सुट्टीसाठी येऊ शकतात. (Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi arrives in Srinagar and takes a boat ride in Nigeen Lake)

जम्मू-काश्मीरचे काँग्रेस अध्यक्ष विकार रसूल वाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गांधी कुटुंबियांचा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. हा पूर्णपणे वैयक्तिक आणि खाजगी दौरा आहे. जम्मू-काश्मीर हे त्याचे घर आहे… त्याला इथल्या लोकांवर आणि या भूमीवर प्रेम आहे, म्हणून त्यांना दोन दिवस इथे शांततेत घालवायचे आहेत.”

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी गेल्या एक आठवड्यापासून लडाखच्या दौऱ्यावर होते. शुक्रवारी सकाळी कारगिलमध्ये जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर ते शुक्रवारी संध्याकाळी श्रीनगरला पोहोचले. त्यानंतर शनिवारी सकाळी सोनिया गांधीही श्रीनगरमध्ये दाखल झाल्या. पुढील तीन दिवस ते जम्मू-कश्मीरमध्ये असणार आहेत. या दौऱ्यात त्यांचा कोणताही राजकीय कार्यक्रम नियोजित नाही.

चीनने आमच्याकडून हजारो किलोमीटर जमीन हिसकावून घेतली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी लडाख दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी कारगिलमधील सभेला संबोधित केले. भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या हालचालींवर ते म्हणाले, चीनने आपल्याकडून हजारो किलोमीटर जमीन हिसकावून घेतली आहे. मात्र यावर पंतप्रधानांनी खोटे बोलले. एक इंचही जमीन गेली नसल्याचे ते सांगत आहेत. हे पूर्णपणे खोटे आहे.

22 ऑगस्ट रोजी राहुल गांधी लेह येथून बाईकवरून 130 किलोमीटर प्रवास करत लामायुरूला गेले. राहुल गांधींनी लडाखमध्ये सुमारे 700 किलोमीटर बाईक चालवली, 19 ऑगस्ट रोजी त्यांनी लेह ते पॅंगॉन्ग लेकपर्यंत 224 किमी बाईक चालवली. त्यानंतर 21 ऑगस्टला 264 किमी बाईकवरुन प्रवास करत पँगॉन्ग लेकवरून खार्दुंग ला पोहोचले. तिथून खार्दुंग ला पासून लेह ला गेले आणि 22 ऑगस्ट रोजी त्यांनी लेह ते लामायुरूपर्यंत 136 किमी बाईक चालवली.

दरम्यान, राहुल गांधी यांचा लडाख दौरा त्यांच्या भारत जोडो यात्रेचा विस्तार असल्याचे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. ते म्हणाले, जानेवारीत लडाखच्या लोकांच्या शिष्टमंडळाने राहुल गांधी यांना लडाखला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर ते आता संपूर्ण लडाखमध्ये फिरत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube