मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांत शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्यात आता ठाकरे गटाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची कोंडी करण्याची रणनिती आखली आहे. ठाकरे गटाकडून शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या दालनात आयोजित बैठकीत रणनिती ठरविण्यात आल्याची माहिती आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. हा आरोप विरोधकांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच त्यांनी शिंदे यांची कोंडी करण्याच्या हेतून अविश्वास ठराव आणण्याचे प्रयत्न चालविल्याची चर्चा आहे.
हे सुद्धा वाचा : उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी एकनाथ शिंदेंचा पहिला वार
याबाबतीत विधानपरिषदेत ठाकरे गटाचे पारडे जड आहे.कारण त्यांच्याकडे आमदारांचे संख्याबळ जास्त आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीही बरोबर आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे नोटीस देण्याबाबत निवेदनही दिले आहे. या सगळ्या घडामोडी पाहता ठाकरे गटाने मुख्यमंत्री शिंदे यांची कोंडी करण्यासाठी तिरकी चाल खेळली आहे.या खेळीला सत्ताधारी कसा शह देतात हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.
Mohit Kamboj : शिंदे गटात येण्यासाठी भास्कर जाधवांनी शंभर वेळा फोन केला
शिंदे असे म्हणाले तरी काय ?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून विरोधकांना चहापानाचे निमंत्रण दिले गेले होते.मात्र, विरोधकांनी यावर बहिष्कार टाकला. आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्रद्रोह झाला असता अशी टीका त्यांनी केली.त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.शिंदे म्हणाले, की दाऊदची बहिण हसीना पारकरला ज्यांनी चेक दिला, त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला तरीही त्यांचा राजीनामा अजित पवार यांनी घेतला नाही. बरे झाले, अशा राष्ट्रद्रोह्यांबरोबर चहा पिण्याची वेळ टळली.
https://www.youtube.com/watch?v=fk7aUk63qJY