Mohit Kamboj : शिंदे गटात येण्यासाठी भास्कर जाधवांनी शंभर वेळा फोन केला…

Mohit Kamboj : शिंदे गटात येण्यासाठी भास्कर जाधवांनी शंभर वेळा फोन केला…

Mumbai : शिंदे गटात येण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शंभरवेळा फोन केले असल्याचा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यासोबत 22 जूनला बंडखोर आमदारामध्ये सामील करुन घेण्याचाही विनंत केली होती, असंही कंबोज यांनी म्हटलयं. कंबोज यांनी भास्कर जाधव यांची खरी कहाणी एका व्हिडिओद्वारे ट्विट करुन सांगितली आहे.

कंबोज ट्विटमध्ये म्हणाले, खिस्यानी बिल्ली खम्बा नोचें!ही म्हण आज भास्कर जाधव यांच्यावर लागू होते. 2022 ला शिवसेना फुटली तेव्हा मला शिंदे गटात घ्या, असं निवेदन भास्कर जाधव यांनी केलं होतं. मात्र सर्व आमदारांनी भास्कर जाधवांना सोबत घेण्यासाठी विरोध केला. भास्कर जाधवांवर विश्वास नाही ठेऊ शकत असं म्हणत त्यांना शिंदे गटात दाखल करुन घेतल नाही.

अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर अडकला लग्नाच्या बेडीत

आज ते जेवढी बडबड करत आहेत त्यावेळी तर त्यांनी गुवाहाटीचं तिकीट काढून ते गुवाहाटीतील हॉटेलच्या बाहेर आले होते, तुम्ही जोपर्यंत मला शिंदे गटात दाखल करुन घेत नाहीत तोपर्य़ंत मी इथून जाणार नसल्याचं भास्कर जाधव म्हणत असल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे.

Uddhav Thackeray : ‘छातीवर धनुष्यबाण लावतील तेव्हा कपाळावर चोराचा शिक्का असेल’

त्यावेळी भास्कर जाधव यांच्यासोबत ठाकरे गटाची बुलंद तोफ संजय राऊतदेखील सहभागी होते, असा खळबळजनक दावा कंबोज यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

गाडीत ड्रग्स टाकल्याशिवाय मोका लावता येणार नाही; ‘त्या’ कटाचा गिरीश महाजनांनी केला धक्कादायक खुलासा

दरम्यान, कालपासून राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. यावेळी आ. भास्कर जाधव अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. जाधव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याच पाहायला मिळालंय.

Ambadas Danve एकातरी आमदारावर देशद्रोहाचा गुन्हा असल्याचे सिद्ध करा… अन्यथा माफी मागा

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाने शिवसेनेच्या सर्व आमदारांना बजावलेल्या व्हीपमुळे दोन्ही गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू होते. आ. भास्कर जाधव यांनी आम्ही अशा व्हीपला भीक घालत नसल्याचे सांगत शिंदे गटाला आव्हान दिले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube