गाडीत ड्रग्स टाकल्याशिवाय मोका लावता येणार नाही; ‘त्या’ कटाचा गिरीश महाजनांनी केला धक्कादायक खुलासा

गाडीत ड्रग्स टाकल्याशिवाय मोका लावता येणार नाही; ‘त्या’ कटाचा गिरीश महाजनांनी केला धक्कादायक खुलासा

मुंबई : मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वादा प्रकरणी छापेमारी प्रकरणात दाखल गुन्ह्यात जळगाव पोलिसांनी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांना ताब्यात घेतले. या प्रकरणावर भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पेनड्राइव्ह प्रकरणाचा उल्लेख करत चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले.

महाजन म्हणाले, की माझ्या गाडीत गांजा टाका, मेडिकलमध्ये काहीतरी काढा. कारण, वाहनात ड्रग्स टाकल्याशिवाय त्याला मोका लावता येणार नाही, असे प्रविण चव्हाण बोलताना रेकॉर्ड झाले आहे. फडणवीसांनाही (Devendra Fadanvis) अडकवा. काहीही करून त्यांना अटक करायची अशा मला वरून सूचना आहे, असे प्रविण चव्हाण (Pravin Chavan) वारंवार बोलत आहेत. ते सगळे रेकॉर्ड झाले आहे. पेन ड्राइव्हमध्येही आले आहे, असे महाजन यांनी सांगितले.

वाचा : Eknath Shinde :मुख्यमंत्री पडता पडता वाचले, संकटमोचक गिरीश महाजनांनी हात देऊन सावरले 

महाजन यांनी उल्लेख केलेले पेनड्राइव्ह प्रकरण तेच आहे जे मागील वर्षी फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान उपस्थित केले होते. या पेन ड्राइव्हमध्ये विशेष सरकारी वकिलाचे संभाषण होते. चव्हाण यांनी महाजन यांना अडकवण्याचा प्लॅन केला होता असा दावा फडणवीस यांनी त्यावेळी केला होता.

Eknath Shinde होय मी साक्षीदार आहे फडणवीस, महाजनांना अटक करण्याच्या कटाचा!

 

काय म्हणाले गिरीश महाजन ?

तीन वर्षांपूर्वी मी फोनवरून कुणाला तरी धमकी दिली आणि मला मोका लावण्यात आला. त्यानंतर पुण्याला घडलेली घटना सांगितली आणि गुन्हा मात्र एकनाथ खडसेंच्या मतदारसंघात जळगावला. नंतर केस पुण्याला पाठवली मग तेथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात मोका लावता येणार नाही म्हणून त्याच्या वाहनात ड्रग टाका अशा सूचना प्रविण चव्हाण पोलीस अधिकाऱ्यांना देत होते.

आता सीबीआय चौकशी सुरू आहे, सत्य बाहेर येत आहे आता. माझा या केसशी संबंध नसताना त्रास दिला. आता लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल. दुसऱ्या केसमध्ये चव्हाण यांना अटक केली.आता ज्यांनी ज्यांनी जे पाप केले ते त्यांना भरावे लागतील.आता हे त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून केले. एकनाथ खडसेंचे ते नाव घेत होते.पण सत्य समोर आले पाहिजे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube