Download App

उत्तर मध्य मुंबईत ट्विस्ट! वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकमांना टक्कर देणार माजी पोलीस अधिकारी?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. या निवडणुकीसाठी त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाची निवड केली आहे.

Maharashtra Lok Sabha Elections 2024 : मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील राजकीय गणित क्षणाक्षणाला बदलत आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडीने मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना तिकीट दिलं. त्यांच्या विरोधात महायुतीने लोकप्रिय चेहरा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उमेदवारी काल जाहीर केली. या दोघांतच लढत होईल अशी चर्चा असतानाच मोठा ट्वि्स्ट आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे देखील निवडणुकीत उतरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय पांडे अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. या निवडणुकीसाठी त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाची निवड केली आहे.

भाजपाने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजनांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या, दहा वर्षांच्या खासदारकीत…

या मतदारसंघातील नागरिकांनी निवडणूक लढण्याचा आग्रह केला. त्यामुळे निवडणूक लढण्याबाबत विचार सुरू आहे. अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही अशी माहिती संजय पांडे यांनी माध्यमांना दिली. जर संजय पांडे यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाच तर  या मतदारसंघात तिरंगी लढत होईल. त्यामुळे मतविभागणी होण्याची शक्यताही राहिल. याचं गणित संजय पांडे यांच्या निर्णयावर अवलवंबून राहिल.

कोण आहेत संजय पांडे?

संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मार्च 2021 मध्ये बदली केली म्हणून नाराज होत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले होते. यानंतर काही काळ ते रजेवर गेले होते. पांडे यांनी कानपूर आयआयटीमधून कॉम्प्यूटर इंजिनिअरिंगही केले आहे. त्यांनी पुणे एसीपीचा पदभार घेत कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर पांडे मुंबई डीसीपी रँकचे अधिकारी बनले. यानंतर त्यांनी नार्कोटिक्स, इकॉनॉमिक्स विभागातही काम केले.

मोठी बातमी! पूनम महाजनचा पत्ता कट, मुंबई उत्तर मध्य मधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर

उज्ज्वल निकम महायुतीचे उमेदवार

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपकडून उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता या मतदारसंघात काँग्रेसच्या (Congress) वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) विरुद्ध उज्ज्वल निकम अशी लढत होणार आहे.  विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून भाजपने यावेळी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

follow us

वेब स्टोरीज