Download App

‘शिंदेंची शिवसेना जत्रेतली, त्यांचे तंबू उठण्याची वेळ आली’; शिंदे गटाच्या टीझरवर राऊतांचा घणाघात

Sanjay Raut News : शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जून रोजी आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून वर्धापनदिनाची जोरदार तयारी सुरू आहे. शिंदे गटाने एक टीझर लाँच केला आहे. या टीझरवरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. ही जत्रेतील खोटी शिवसेना आहे, असे राऊत म्हणाले. राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, मणिपूर येथील हिंसाचार, शिंदे गटाचा टीझर यांसारख्या विविध मुद्द्यावर मते व्यक्त केली.

राऊत म्हणाले, येत्या 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच शिवसेनेचे प्रमुख आहेत. गावच्या जत्रेत तंबू असतात. तंबूत खोटा चंद्र आणि मर्सिडीज गाडी असते. लोक त्या चंद्रावर बसून फोटो काढतात. तशी खोटी शिवसेना आपल्या पाठीमागे लावून फोटो काढत टीझर प्रसिद्ध केले जातात. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे जिथे आहेत ती शिवसेना आहे. बाकी जत्रा संपल्यावर तेथील तंबू उठतात. तसेच तंबू उठायची वेळ झाली आहे, अशी टीका राऊत यांनी शिंदे गटावर केली.

राष्ट्रवादीसाठी संजय राऊतांची काय किंमत? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

मणिपूर येथे सुरू असलेल्या हिंसाचारावर राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राऊत म्हणाले, गेल्या तीन महिन्यांपासून या देशातल्या सीमेवरील महत्त्वाचं राज्य मणिपूर हे पूर्णपणे हिंसेच्या आगीत अडकलेलं आहे. त्या राज्याचे मंत्री केंद्राचे विदेश राज्य मंत्री यांचं घर जाळण्यात आलं. हजारो लोकांनी पलायन केलं. गृहमंत्रालयाचे हे अपयश आहे. लोक मारले जात आहेत. शंभरच्यावर उग्रवादी घुसले आहेत. त्यावर एकही शब्द गृहमंत्री बोलायला तयार नाहीत.

चीनवर सर्जिकल स्ट्राइकची हिंमत आहे का?

तुमची चीनशी लढण्याची ताकद नाही म्हणून तुम्ही मणिपूरमध्ये हस्तक्षेप करत नाही. मणिपूरमध्ये घुसलेल्यांना चीनची मदत मिळत आहे, असा आरोप राऊत यांनी केला. जसा पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक केला तसा चीनमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिम्मत आहे का? असा सवाल राऊत यांनी केली.

बाल शिवसैनिक ते युवा सेना, ठाकरे गटाच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ

टीझरमध्ये काय ? 

शिवसेना (शिंदे गट) नेते नरेश म्हस्के यांनी हा टीझर ट्विट केला आहे. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघे दिसत आहेत.

Tags

follow us