बाल शिवसैनिक ते युवा सेना, ठाकरे गटाच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ
Ayodhya Pol : शिवसेनेच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ. हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना आव्हान दिल्यानंतर खऱ्या अर्थाने अयोध्या पोळ चर्चेत आल्या होत्या. शिवसेनेतील बंडखोरीनंतर अयोध्या पोळ सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. त्यांच्यातील याच आक्रपणामुळे शिंदे गटातील अनेक नेत्यांच्या हिटलिस्टवर त्या आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमक्या देखील दिली होती. आता ठाणे कळवा येथील एका कार्यक्रमात त्यांच्यावर शाईफेक करत मारहाण करण्यात आलीय. ठाण्याचे हे प्रकरण नक्की काय आहे हे समजून घेण्यापूर्वी अयोध्या पोळ कोण आहेत हे पाहूया..
अयोध्या पोळ या मूळच्या परभणी जिल्ह्यातल्या आहेत. त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केलं. त्यानंतर पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत झालं. गेली 12 वर्षांपासून त्या मुंबईतच राहतात. अयोध्या यांना लहानपणापासून शिवसेनेचं बाळकडू मिळालंय. त्यांच्या आई म्हणजेच गंगूबाई या शिवसेनेच्या पालम तालुका प्रमुख होत्या. बाल शिवसैनिक ते युवा सेना असा त्यांचा प्रवास झालाय. आता ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक आहेत.
Adipurush: ‘आदिपुरुष’च्या पहिल्या दिवसाची कमाई ऐकून तुम्ही देखील चक्रावून जाल !
ठाणे-कळवा प्रकरण काय आहे…
कळवा येथील मनीषा नगर भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात अयोध्या पोळ यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी महापुरुषांच्या फोटोला हार घालत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला म्हणून स्थानिक महिलांनी पोळ यांच्यावर शाई फेकली. यानंतर त्या कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन बाहेर आल्यानंतर पुन्हा काही महिलांनी मारहाण केली.
अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ला नियोजित षडयंत्र, केदार दिघेंचा शिंदे गटावर आरोप
आता शाईफेक आणि मारहाण करणाऱ्या महिला कोण होत्या हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण अयोध्या पोळ यांना हा कार्यक्रम ठाकरे गटाचा आहे म्हणून आमंत्रित केलं होतं. हा कार्यक्रम ठाकरे गटाचा नसून अयोध्या पोळ यांच्यासाठी सापळा रचण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. आता अयोध्या पोळ प्रकारावरुन ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार हे नक्की.