Adipurush: ‘आदिपुरुष’च्या पहिल्या दिवसाची कमाई ऐकून तुम्ही देखील चक्रावून जाल !

Adipurush: ‘आदिपुरुष’च्या पहिल्या दिवसाची कमाई ऐकून तुम्ही देखील चक्रावून जाल !

Adipurush: बहुचर्चित ‘आदिपुरूष’ (Adipurush) हा सिनेमा 16 जून रोजी संपूर्ण देशात रिलीज झाला आहे. सिनेमाच्या पहिल्या दिवशी पहिल्या शोला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. (Adipurush Movie Released )हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या ५ भाषांमध्ये तब्बल ६२०० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला.

एकट्या हिंदी भाषेतच हा सिनेमा तब्बल ४ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Adipurush Review) यामुळे या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Parbhas) या सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवला, याबाबतची अंदाजे आकडेवारी समोर आली आहे. ‘आदिपुरुष’च्या पहिल्या दिवसात बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून सर्वांनाच मोठा धक्का बसणार आहे.

‘आदिपुरुष’ वादाच्या भोवऱ्यात, हिंदू सेनेची हायकोर्टात याचिका

या सिनेमाने पहिल्याच दिवशी अनेक विक्रम रचले आहेत. ‘आदिपुरुष’ने पहिल्याच दिवशी ८५ ते ९० कोटींची कमाई केली आहे. पण हे अंदाजे आकडे आहेत, आणि त्यामध्ये रात्रीच्या शोचा समावेश नाही. ‘एनडीटीव्हीने’ याबद्दल माहिती दिली आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमाने एकट्या हिंदीमध्ये ४५ कोटींची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाने हिंदी भाषिक राज्यांमध्ये सर्वाधिक मोठी कमाई केली आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

शिवाय सिनेमाने इतर दाक्षिणात्य भाषांमध्ये चांगलीच मोठी कमाई केली आहे. अशा परिस्थितीत प्रभासचा हा सिनेमा या वीकेंडला धमाकेदार कमाई करेल असे मत ट्रेड अॅनालिस्ट्स व्यक्त केले जात आहे. ५०० कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमाबद्दल समीक्षक आणि प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे अधिकृत आकडे अद्याप समोर आले नाही. मात्र वीकेंडला हा सिनेमा दमदार कमाई केले जात असल्याचे म्हटलं जात आहे. त्याचं कारण म्हणजे या आठवड्यात ‘आदिपुरुष’शिवाय इतर कोणताही सिनेमा प्रदर्शित झाला नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube