विद्युत जामवालने दिलेला शब्द पाळला; रोमन रेंसचा भारतीय चाहत्यांसाठी खास संदेश
Vidyut Jammwal : अभिनेता विद्युत जामवालने भारतीय चाहत्यांना दिलेला शब्द अखेर पाळला आहे. हॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विद्युतने त्याचा
Vidyut Jammwal : अभिनेता विद्युत जामवालने भारतीय चाहत्यांना दिलेला शब्द अखेर पाळला आहे. हॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विद्युतने त्याचा ‘स्ट्रीट फायटर’मधील सहकलाकार आणि WWE सुपरस्टार रोमन रेंस (Roman Reigns) अर्थात जो अनोईचा भारतीय चाहत्यांसाठी खास संदेश सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पॅरामाउंट पिक्चर्स आणि लिजेंडरी एंटरटेनमेंटचा ‘स्ट्रीट फायटर’ हा अॅक्शनपट आज भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात विद्युत जामवाल ‘धालसिम’ची भूमिका साकारत असून, त्याचा हा पहिलाच हॉलीवूड चित्रपट आहे.
विद्युतने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं, “भारतामध्ये मी अनेकांना वचन दिलं होतं की, रोमन रेंसला भारतात येण्याची विनंती करेन आणि भारतीय चाहत्यांसाठी त्याला संदेशवाहक बनवण्याचा प्रयत्न करेन. माझी विनंती स्वीकारल्याबद्दल त्याने दाखवलेली नम्रता हा क्षण आणखी खास बनवते. हा घ्या…”
व्हिडीओमध्ये विद्युत म्हणतो, “हा संदेश भारतातील त्या प्रत्येकासाठी आहे, ज्यांना या व्यक्तीला भेटण्याची उत्सुकता आहे. आम्ही त्याला भारतात येण्यासाठी आमंत्रित केलं आहे.”
View this post on Instagram
त्यावर रोमन रेंस म्हणतो, “खूप काळ झाला आहे. पण आशा आहे की आम्ही लवकरच पुन्हा भारतात येऊ. मला भारतातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम आहे आणि तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद.” त्यानंतर विद्युतकडे पाहत तो म्हणतो, “हाच खरा मॅन आहे.”
पुणे शिक्षक निवडणूक आमच्यासाठी खूपच सोपी कारण…, कौस्तूभ गावडे स्पष्टच म्हणाले
दरम्यान, ‘स्ट्रीट फायटर’ हा चित्रपट भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. विद्युत जामवाल आणि रोमन रेंसच्या चाहत्यांसाठी या चित्रपटातील त्यांची जोडी आणि रोमनचा भारतासाठीचा खास संदेश चर्चेचा विषय ठरत आहे.