Download App

महाराष्ट्र तापला! आजही उष्णतेचा कहर, हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना इशारा

धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

Weather Update : राज्यात मे महिन्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. उत्तर भारतात (Weather Update) तापमान 47 अंशांच्या पुढे गेले आहे. तशीच परिस्थिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसून येत आहे. प्रचंड उष्णतेने महाराष्ट्र पोळून निघाला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र उन्हाचा त्रास अजूनही कमी झालेला नाही. आताही हवामान विभागाने काळजीत टाकणारी माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात आज उष्ण आणि दमट हवामान राहिल. ठाण्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेचे, काही ठिकाणी पावसाचीही शक्यता

उत्तर महाराष्ट्रात प्रचंड उकाडा जाणवत आहे. काल नगर शहरातील तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे सूर्यास्तानंतरही उष्णतेच्या झळा जाणवत होत्या. त्यामुळे नागरिकांना हा उकाडा असह्य होत होता. याचप्रमाणे धुळे आणि जळगाव जिल्ह्यात बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसात, नंदूरबार जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवार आणि नाशिक जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारी उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवणार आहे.

राज्यात उष्णता वाढण्याचं कारण म्हणजे गुजरात आणि वायव्य महाराष्ट्राच्या वर एक प्रति चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे. यातून बाहेर येणाऱ्या आणि वायव्य दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ठाण्यातही उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मुंबईत दमट आणि उष्ण हवामान राहिल अशी शक्यता आहे.

उर्वरित महाराष्ट्रात मात्र उष्णतेचा जास्त त्रास जाणवणार नाही. नगर, पुणे, सातारा, जालना, बीड येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Weather Forecast : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात गारपिटीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

follow us

वेब स्टोरीज