Download App

उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा आणखी एक झटका.. कसबा-चिंचवड निवडणुकीपुरतीच राहणार मशाल !

Uddhav Thackeray News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार धक्का दिला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडूनही ठाकरेंना जोरदार झटके बसत आहेत. आधी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर पहिला झटका बसला. त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह सुद्धा कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीपुरते (Kasba Chinchwad Bypoll) वापरता येणार आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांची चांगलीच कोंडी होणार आहे. आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निर्णयानंतर समता पक्षाने समता पक्षानेही मशाल चिन्ह आपल्याला द्यावे, अशी मागणा आयोगाकडे केली आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेच्या मार्गात काटे टाकण्याचे असे प्रकार असल्याचे म्हटले.

हेही  वाचा : नाव जपा;, राज ठाकरेंनी बाळासाहेबांचं भाषण ट्विट करून उद्धव ठाकरेंना डिवचलं

शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना म्हणत धनुष्यबाणावर दावा केला.तेव्हा निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले.ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह दिले.आता कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीही हेच चिन्ह वापरण्याची मुभा मिळाली होती. या घडामोडीनंतर निवडणूक आयोगाने आणखी एक निर्णय घेत शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे नाव आणि मशाल हे चिन्ह फक्त पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपुरते वापरता येणार असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने तशी ऑर्डर काढल्याची माहिती आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. मशाल हे चिन्ह आणि सध्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव कायम ठेवावे, अशी मागणी ते करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पक्षांतर्गत वाद सोडविण्याचा अधिकार आहे का, या मुद्द्यावर कोर्टात अपील दाखल करायला पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Tags

follow us