‘नाव जपा…’, राज ठाकरेंनी बाळासाहेबांचं भाषण ट्विट करून उद्धव ठाकरेंना डिवचलं
मुंबई : शिवसेना पक्ष ( shivsena Party ) आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटाला हा मोठा धक्का आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) हा निकाल जाहीर केला आहे. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून मोठा जल्लोश केला जात आहे. या महत्वपुर्ण निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातील 40 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन राज्यात नवं सरकार स्थापन केलं होते. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणुक आयोगात धाव घतली. त्यानंतर आज यासंदर्भातला निकाल आला आहे. आता निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे.
बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं…. #शिवसेना #बाळासाहेब_ठाकरे #Legacy pic.twitter.com/FxO3wprUUF
— Raj Thackeray (@RajThackeray) February 17, 2023
निकाल येताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा ३० सेकंदाचा एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब म्हणत आहेत की, “नाव आणि पैसा, पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो, पण एकदा गेलेलं नाव पुन्हा येत नाही, ते येऊ शकत नाही. काळ्या बाजारात सुध्दा मिळायचं नाही, म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा.,” असा संदेश दिला आहे. या पोस्टसोबत राज ठाकरेंनी बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं, असा कॅप्शनही दिला आहे.
Devendra Fadanvis : राऊतांनी दोन्ही स्टेटमेंट टाईप करून ठेवले होते, फडणवीसांचा टोला
त्यामुळे बाळासाहेबांच्या त्यावेळच्या वाक्यात भविष्यकाळ होता का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.