Download App

नवाब मलिकांचा मोठा निर्णय; ‘या’ कारणामुळे जामीनाचा अर्जच घेतला मागे

Nawab malik Withdraws Bail Application : मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशाीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकणात मलिक यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, आता मलिक यांच्याकडून हा अर्ज मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Maharashtra Politics : ‘पवार साहेबांनी मला फोन केला म्हणाले’.. जयंत पाटलांनी सांगितलं ‘त्या’ बैठकीत काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिकांनी आता जरी हा अर्ज मागे घेतला असला तरी लवकरच वैद्यकिय कारणांमुळे नव्याने अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी त्यांचा वैद्यकिय जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, आता हा जामीन अर्ज मागे घेण्यात आला आहे.

यानंतर आता न्यायालयाने त्यांना नव्याने याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याचे मलिक यांचे वकिल कपिल सिब्बल यांनी सांगितले. वैद्यकिय कारणांसाठीच मलिक यांनी जामीन मागितला आहे. त्यांची एक किडनी खराब आहे. दुसरी किडनीही जास्त काम करत नाही. त्यामुळे प्रत्येक तपासणीसाठी न्यायालयाकडून परवानगी मिळण्यासाठी बराच कालावधी लागतो, असेही सिब्बल यांनी न्यायालयात सांगितले.

एनडीएला बिहारमध्ये मिळाला नवा भिडू; अमित शहा यांच्या भेटीनंतर निर्णय

मनी लाँड्रिंग आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संबंधित असलेला कुर्ला येथील भूखंड बाजारभावापेक्षा अत्यल्प किंमतीत घेतल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. या प्रकरणात नवाब मलिक यांना फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

Tags

follow us