Sharad Pawar Retirement Live : पवारांनी निर्णय मागे घेण्याचा कोणताही विचार केलेला नाही- प्रफुल्ल पटेल

NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेच यांचीच वर्णी लागेल, अशी माहिती समोर येत आहे. सुप्रिया सुळे यांना […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (87)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (87)

NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेच यांचीच वर्णी लागेल, अशी माहिती समोर येत आहे.

सुप्रिया सुळे यांना पक्षाध्यक्ष होण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू आहे. अजित पवार यांचं कथित नाराजी नाट्य सुरू असतानाच पक्षाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, अशी माहिती आता समोर येत आहे.

Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला नाही तर राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी थेट विभागणी पक्षात केली जाण्याची शक्यता आहे. सुळे यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव आधीच झाली होती. लवकरच निवडणूक आयोगाला याबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या पक्षाच्या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब केले जाण्याचीही शक्यता आहे.

दरम्यान, ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. सुप्रिया सुळे यांनी अध्यक्ष होण्यास काहीच अडचण नाही. कामाची विभागणी आधीच झाली आहे. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी विभागणी झाली आहे. त्यांचे लोकसभेत काम आहे. त्यामुळे त्या अध्यक्ष होण्यात काहीच अडचण नाही, असे भुजबळ म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या 26 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत शरद पवार यांच्या राजीनाम्याची चर्चा झाली होती. तर शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या बैठकीत पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे.

 

Exit mobile version