Download App

नितेश राणे, पंकजा मुंडेंसह अनेक दिग्गज घेणार शपथ?; खाते वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला!

  • Written By: Last Updated:

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर येत्या 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून, या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय तिन्ही पक्षांतील काही नेत्यांनाही यावेळी शपथ दिली जाणार असल्याचे सांगितले जात असून, भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कोणते नेते शपथ घेऊ शकतील याची संभाव्य यादी समोर आली आहे. ज्यात भाजपकडून एकूण 16 मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या संभाव्य यादीत पंकजा मुंडेसह नितेश राणे आणि गोपीचंद पडळकरांचेही नाव असल्याची माहिती आहे.

Video : एकनाथ शिंदे काम करू शकणार का?; तपासणी केलेल्या डॉक्टरांनी दिलं महत्त्वाचं उत्तर!

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावे

भाजपकडून शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांमध्ये कोकणातून रविंद्र चव्हाण, नितेश राणे, गणेश नाईक, मुंबईतून मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, राहुल नार्वेकर अतुल भातखळकर, पश्चिम महाराष्ट्रातून शिवेंद्रसिंहराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील यांची नावे समोर आली आहेत. तर, विदर्भातून चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन, जयकुमार रावल तर, मराठवाड्यातून पंकजा मुंडे आणि अतुल सावे यांचे नाव असल्याचे सांगितले जात आहे.

अजितदादांनी उगाच भाजपला पाठिंबा दिला नाही; ‘या’ तीन मुद्द्यांत दडलंय मोठं पॉलिटिक्स

शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे

1. एकनाथ शिंदे
2. दादा भुसे
3. शंभूराज देसाई
4. गुलाबराव पाटील
5. अर्जुन खोतकर
6. संजय राठोड
7. उदय सामंत

”तिकीट फायनल झालं, गावाकडं आलो अन् ठाकरेंनी शब्द फिरवला”; रविकांत तुपकरांचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीची संभाव्य मंत्र्यांची नावे 

1. अजित पवार
2. अदिती तटकरे
3. छगन भुजबळ
4. दत्ता भरणे
5. धनंजय मुंडे
6. अनिल भाईदास पाटील
7. नरहरी झिरवळ
8. संजय बनसोडे
9. इंद्रनील नाईक
10. संग्राम जगताप
11. सुनील शेळके

खाते वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला!

महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा फॉर्म्युला जवळपास ठरल्यात जमा असल्याचे सांगितले जात आहे. यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन उपमुख्यमंत्री असतील. भाजपकडे विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती असण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाला अर्थमंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नगर विकास मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित मंत्रिपदाची चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित मंत्रिपदावर त्यानंतर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री पदासोबतच गृहखातेही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार असल्याचे सांगितले जात आहे.

follow us