Download App

राजकीय टीकेनंतर ‘वर्षा’ अन् ‘सागर’ बंगल्यावरील खर्चावर मर्यादा…

विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या टीकेनंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ आणि ‘सागर’ या शासकीय बंगल्याच्या खानपानाच्या खर्चावर नियंत्रित आणण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही शासकीय निवासस्थानासाठी 5 कोटी रुपयांची मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. या प्रसिद्धी पत्रकात दोन्ही शासकीय निवासस्थानाच्या खाद्यपदार्थांचे दरही जाहीर करण्यात आले आहेत.

Corona झपाट्याने वाढतोय, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिला राज्यांना सल्ला!

हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावरील चहापानाच्या खर्चावरुन राज्य सरकारवर टीका केली होती. त्यानंतर हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. चहापानाच्या 2 कोटींच्या खर्चावरुन वर्षा बंगल्यात सोन्याचा चहा पित होता काय? असा सवाल अजित पवारांनी केला होता.

World Cup पात्रता फेरीत UAE च्या गोलंदाजाचा मजेशीर Video, पाहून हसू आवरेना

त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थानाच्या खर्च नियंत्रित करण्यासाठीच सूचना केल्या होत्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सुचनेनूसार ‘वर्षा’ आणि ‘सागर’ बंगल्याच्या खानपानासाठी दोन वेगवेगळे कंत्राट जाहीर करण्यात आले आहेत.

Manish Sisodiya : आपल्या पंतप्रधानांना कोणी पण गंडवतं; जेलमधून सिसोदियांचा मोदींवर हल्लाबोल

दोन्ही शासकीय बंगल्याच्या खानपानावर 5 कोटी रुपयांच्या मर्यादा लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानासाठी साडेतीन कोटी रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानासाठी दीड कोटी रुपये खर्चाची निविदा काढण्यात आलीय.

अंडरवर्ल्डप्रमाणं शिंदे आणि फडणवीसांच्या टोळ्या…राऊतांचा हल्लाबोल

कोणते पदार्थ मिळणार?
खाद्य पदार्थांच्या यादीत 44 पदार्थांचा समावेश असून विशेष पदार्थांच्या यादीत 29 पदार्थ आहेत.
सर्वात स्वस्त पदार्थ वेफर्स असून त्यासाठी कंत्राटदारास फक्त 10 रुपये मिळणार आहेत.
विशेष पदार्थांमध्ये मसाला चहा, कॉफी व ग्रीन टी ही सर्वात स्वस्त असून त्यासाठी फक्त 14 रुपये, तर मसाला दुधासाठी 15 रुपये मोजावे लागणार आहेत.
विशेष पदार्थांमध्ये खाण्यासाठी कोथिंबीर वडी, समोसा, उकडीचे मोदक, स्पेशल पेढा हे सर्वात स्वस्त म्हणजे 15 रुपयांत दिले जाणारे पदार्थ असणार आहेत.
विशेष वर्गवारीत सर्वात महाग हे शाकाहारी व मांसाहारी बफेट आहेत.
पदार्थांमध्ये शाकाहारी बफेटसाठी 160 रुपये, तर मांसाहारी बफेटसाठी 175 रुपये आकारण्यात येणार आहेत.
स्पेशल शाकाहारी बफेट 325 रुपयांना, तर मांसाहारी बफेट 350 रुपयांत मिळणार आहे.

दरम्यान, राजकीय टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला असून दोन्ही शासकीय निवासस्थानी येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये, यासंदर्भातही सूचना त्यांनी दिल्या आहेत. एकंदरीत दोन्ही बंगल्यावर येणाऱ्या पाहुण्यांसाठी 5 कोटी रुपये खर्चाचा आलेख आखण्यात आला आहे.

Tags

follow us