Download App

‘एकनाथ शिंदे हे फक्त खुर्च्यांचे मुख्यमंत्री’ ; आदित्य ठाकरेंनी पुन्हा डिवचले..

Aditya Thackeray : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सभा घेतली. त्यांनी सभेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांवर तुफानी टीका केली. त्यानंतर त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही सभा झाली. या सभेत त्यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. या सभेला फार गर्दी झाली नाही असा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून नेहमीच केला जातो. यानंतर आज पुन्हा एकदा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

वाचा : Maharashtra Politics : अनिल जयसिंघानी प्रकरणावरून आदित्य ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेंनी..

ठाकरे म्हणाले, की एकनाथ शिंदे हे फक्त खुर्च्यांचे मुख्यमंत्री आहेत. जनतेचे नाहीत. आज गुढीपाडव्यानिमित्त गिरगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते.

ते पुढे म्हणाले, की मी आज काहीच राजकीय बोलणार नाही. सण समारंभानिमित्त येथे आलो आहे अशा ठिकाणी राजकीय भाष्य करणे हा बालिशपणा ठरेल. काही पक्ष असं करतात पण ते तसेच आहेत त्याला आपण काही करू शकत नाही. आज या ठिकाणी मी फक्त इतकेच म्हणेल की सर्वांनी आजचा सण आनंदात साजरा करावा.

राज्यात आज गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र जल्लोष, उत्साहाचे वातावरण आहे. हाच उत्साह पहायला मी गिरगावात आलो आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील शेतकरी आज अवकाळी पावसाच्या संकटात सापडला आहे. अशा वेळी आधार देणे हे सरकारचे कर्तव्य आहे मात्र तसे होताना दिसत नसल्याचे ठाकरे म्हणाले.

‘मेन इन ब्ल्यू’ आदित्य ठाकरेंनी बदलला त्यांचा लकी रंग; दिसले वेगळ्या शर्टमध्ये

दरम्यान,  जयसिंघानी प्रकरणातही त्यांनी शिंदे यांच्यावरही टीका केली होती.  याबद्दल विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरेंना याना विचारलं. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “हे सर्वांना माहिती आहे. ज्या जिल्ह्यात जयसिंघानी येतो, तेव्हा जिल्हाप्रमुख कोण होते ? पण मला याच्या खोलात जायचं नाही. कारण, याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे. कोणाच्या घरात जाऊ शकतात, हे खूप गंभीर असल्याचे यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितल होतं.

 

Tags

follow us