Download App

गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेऊ, अजितदादांनाही.. अब्दुल सत्तारांची टोलेबाजी !

Abdul Sattar : सध्या राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नावाची चांगलीच चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही ती बैलासमोर नाचो किंवा आणखी कोणासमोर नाचो, तुला काय त्रास होतोय ? अशी प्रतिक्रिया देत पत्रकाराला खोचक टोला हाणला होता. त्यानंतर आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनीही प्रतिक्रिया देत अजित पवार यांना उद्देशून प्रतिक्रिया दिली आहे.

सत्तार म्हणाले, ज्यांचं वय डोळे मारायचं आहे, ते डोळे मारतात. ज्यांनी लहानपणी मारले नाहीत ते आता मारत आहेत. अजित पवार जे काही बोलतात त्याला महत्व आहे. कारण ते विरोधी पक्षनेते आहेत. विरोधक असल्याने विरोधाची भाषा करायची हेच त्यांचे काम आहे. आम्ही सत्ताधारी आहोत. त्यामुळे शेतकरी जे काही बोलतो, करतो मला तेच खर वाटतं असे सत्तार म्हणाले.

Rule Change : 1 मे पासून ATM आणि GST सह अनेक नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

गौतमी पाटील यांना ओळखता का, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर सत्तार म्हणाले, सिल्लोड येथे एकदा कृषी महोत्सवात त्यांचा कार्यक्रम पाहिला होता. सिल्लोडला गौतमी पाटील यांचा कार्यक्रम ठेवला होता. आता आणखी एक वेळ त्यांचा कार्यक्रम ठेऊ आणि या कार्यक्रमाला अजित पवार यांनाही निमंत्रण देऊ. अजितदादा मेरे दोस्त है.., गलतियां सबसे होती है, अब्दुल सत्तार की छप जाती है, अजित पवार की छुप जाती है, अशी शायरीही त्यांनी यावेळी केली.

Tags

follow us