वेळ आली तर दोन्ही जागा लढणार! पुणे पदवीधर अन् शिक्षकबाबत मंत्री गोरेंचं मोठं वक्तव्य

Pune Graduate and Teachers' constituencies च्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महायुतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता

Jaykumar Gore

 Minister Jaykumar Gore makes a major statement regarding  Pune Graduate and Teachers’ constituencies : पुण्यामध्ये आता पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महायुतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. कारण भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. याबाबत भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूरमध्ये बोलताना सूचक विधान केलं आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीतच लढत होणार असं चित्र निर्माण झालं आहे.

नेमकं काय म्हणाले जयकुमार गोरे?

एकीकडे पुण्यामध्ये आता पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान मंत्री जयकुमार गोरे हे पंढरपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांना या सोलापूर जिल्हा बँकेसह या निवडणुकीवर प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की,

बंद खोलीत मराठा समाजाचे कोणते प्रश्न मांडायचे होते? बारस्करांचा जरांगेंना सवाल

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवायची, भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरणार की महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष घेत असतात. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नेतृत्व जो निर्णय घेईल, त्यानुसार निवडणुकीसाठी पूर्ण तयारीने मैदानात उतरण्याची आमची भूमिका आहे.

सत्तरीत फुललं प्रेम! वृद्ध प्रियकराची हत्या; DNA अहवालानंतर दीड महिन्यांनी झाला उलगडा

मागील वेळी पदवीधर तसेच शिक्षक या दोन्ही मतदारसंघांत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता, हे वास्तव आहे. राजकारणात यश-अपयश आणि फायदा-तोटा हा प्रक्रियेचा भाग असतो. मात्र, झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

गरीब रुग्णांसाठी 1000 डायलिसिस सेशन्स मोफत; साने गुरुजी तरुण मंडळाचा उपक्रम

मात्र आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. विशेषतः मतदार नोंदणीवर पक्षाकडून भर दिला जात आहे. यावेळी मतदार नोंदणीपासूनच निवडणुकीच्या तयारीचे नियोजन करण्यात आले असून, संघटनात्मक पातळीवरही तयारी अधिक मजबूत केली जात असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले.

मागील निवडणुकीतील स्थिती काय?

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरूण लाड विजयी झाले होते. तर शिक्षक मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत काँग्रेसचे जयंत आसगावकर गे विजयी झाले होते. त्यात पदवीधरमध्ये भाजपला पराभवाल सामोरे जावे लागले होते. त्या पराभवचा वचपा काढण्यासाठी आता मात्र भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच आतापासूनच यासाठी कंबर कसली आहे. त्यात पुण्यासह सोलापूर, सांगली, सातारा, आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

follow us