Download App

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र ? ; बच्चू कडू म्हणाले, पाकिस्तानची लोकं..

Maharashtra Politics : देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपल्याकडे विधानसभा निवडणुका होतात. पण, 2024 साली लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकीची शक्यता आहे. या संदर्भात महाराष्ट्र भाजपने पक्ष नेतृत्वाला एक प्रस्ताव सादर केला आहे. यावरून आता राजकीय टिकाटिप्पणी सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणूक एप्रिल-मे 2024 मध्ये होतील. राज्यात विधानसभा निवडणूक ऑक्टोबर 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. पण, राज्यातील सत्तातरानंतर मध्यावधी निवडणुका होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. यावर आ. बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाष्य केले आहे.

हे वाचा : बच्चू कडूंना धक्का ! चांदूरबाजार संस्थेच्या निवडणुकीत मिळाल्या फक्त ‘इतक्या’ जागा 

कडू म्हणाले, एकत्र होऊ द्या नाही तर वेगळे होऊ द्या मते तर लोकच देणार आहेत ना. पाकिस्तानची लोकं थोडीच मतदान करणार आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

यावेळी त्यांनी विरोधकांनाही खडेबोल सुनावले. सत्ता नसली की शेतकरी आठवतो. सत्ता असली की धनाढ्य लोकांबरोबर यांचे मैत्री होते, ही वस्तूस्थिती आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही. परंतु, किती नाटक करणार, विरोधात असल्यावर शेतकरी आठवला, सत्तेत होता तेव्हा दादांना शेतकरी आठवला नाही, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला.

 राज्य विधानसभा निवडणुका लोकसभेसोबत, महाराष्ट्र भाजपचा केंद्रीय नेतृत्वाला प्रस्ताव

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसोबत घेण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबत घेण्याचा प्रस्ताव प्रदेश भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाला दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते या प्रस्तावावर विचार करत असल्याची माहिती आज ‘द हिंदू’ या आघाडीच्या वृत्तपत्राने प्रकाशित केली आहे.

या वृत्तानुसार भाजपची केंद्रीय समिती लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूक घेण्याच्या प्रदेश भाजपच्या प्रस्तावावर विचार करत आहे. राज्यातील महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेचा मोठा फायदा होऊ शकतो. तो फायदा घेण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा एकत्रित घेण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र भाजपने दिला आहे.

 

Tags

follow us