Download App

सोमय्यांचा घणाघात! म्हणाले, ठाकरेंच्या राज्यात अनिल परबांनी..

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) ठाकरे गटाविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. अनिल परब, सदानंद कदम यांच्यावरील कारवाई प्रकरणी त्यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. घोटाळा कुणी केला ? चिटींग कुणी केली ? फ्रॉड कुणी केला ? हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना माहिती आहे का ? समुद्राचीही जमीन खाल्ली ठाकरेंच्या राज्यात अनिल परबांनी आणि सदानंद कदम (sadanand Kadam) त्यांचे पार्टनर असा घणाघात सोमय्या यांनी केला.

सोमय्या पुढे म्हणाले, की या प्रकरणात आणखी बरीच माहिती येणे बाकी आहे. तेव्हा कळेल की हे आणखी काय काय उद्योग करतात ते. किती कोटी रुपये मिळाले हे ही तेव्हा कळेल, असा इशारा सोमय्या यांनी दिला.

Kirit Somaiya : विरोधकांचे घोटाळे काढणाऱ्या किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा  

सोमय्या यांनी मुश्रीफांवरील ईडीच्या कारवाईवरही भाष्य केले. ते म्हणाले, की मुश्रीफांवर दुसऱ्यांदा कारवाई नाही तर ही कारवाई अनेक दिवसांपासून सुरू आहे. मुश्रीफ यांनी 58 कोटींचा गैरव्यवहार केल्याची कबुली आयकर विभागाला दिल्याचा दावाही त्यांनी केली.

किरीट सोमय्या यांचीही न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, असे पत्रकारांनाी विचारले असता सोमय्या म्हणाले, की आम्ही टेन्शन घेणार नाही. खुशाल चौकशी करा. मला कोणतीच भीती नाही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार असल्याचे सोमय्या यावेळी म्हणाले.

Kirit Somaiya कोल्हापुरात दाखल होताच हसन मुश्रीफांवर 500 कोटींचा आरोप

दरम्यान, सोमय्या यांनी केलेल्या या आरोपांवर ठाकरे गटातील नेत्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता यावर ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us