Kirit Somaiya कोल्हापुरात दाखल होताच हसन मुश्रीफांवर 500 कोटींचा आरोप

Kirit Somaiya कोल्हापुरात दाखल होताच हसन मुश्रीफांवर 500 कोटींचा आरोप

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)आज (दि.23) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सोमय्यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur)पोहचताच राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांच्यावर हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की, हसन मुश्रीफांचा घोटाळा 158 कोटी रुपयांचा दिसत होता. मात्र, हा घोटाळा वास्तवात 500 कोटी रुपयांहून अधिकचा असल्याचा गंभीर आरोप यावेळी किरीट सोमय्यांनी केलाय.

किरीट सोमय्या म्हणाले की, हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बँकेलाही सोडलं नाही. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Kolhapur District Central Cooperative Bank)आणि सरसेनापती संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्यालाही (Sarsenapati Santaji Ghorpade Sahakari Sakhar Karkhana) हसन मुश्रीफांनी अशा पद्धतीनं लुटल्यानं त्यांची सर्व बाजूनं चौकशी सुरू आहे. या कारवाईची माहिती घेण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी मी आज बँकेला भेट देणारंय, असंही सांगितलं.

Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराला राष्ट्रीय नेतृत्त्वाचा ग्रीन सिग्नल नाहीच, आमदारांची प्रतिक्षा वाढली

सोमय्या म्हणाले की, मी गरीब शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा करणार नाही. दरम्यान, किरीट सोमय्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यात आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाणार आहेत. मुश्रीफ यांनी संघर्ष न करता सोमय्या यांच्या स्वागताची भूमिका घेतली.

गेल्या काही दिवसांपासून सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला चुकीच्या पद्धतीनं पैसे पुरवल्याचा आणि जिल्हा बँकेतून गडहिंग्लज कारखाना चालवण्यास घेतलेल्या ब्रिक्स कंपनीला केलेला अर्थपुरवठाही वादग्रस्त असल्याचा आरोप केलाय. त्यावर मुश्रीफ यांच्यासह त्यांचे नातेवाईक, त्यांचा घोरपडे कारखाना, जिल्हा बँकेवर ईडीनं छापेमारी केली होती. किरीट सोमय्या आज सहकार सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, शेतकरी यांची भेट घेणार आहेत.

ईडीच्या कारवाईवेळी कागल येथे मुश्रीफ कार्यकर्त्यांनी तर जिल्हा बँकेत कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता. कोल्हापूर जिल्हा बँकेत किरीट सोमय्या यांचं स्वागत असल्याची प्रतिक्रिया आज बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube