Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबतीत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद अजूनही राजकारणात उमटत आहेत. शिरसाट यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. महिला आयोगानेही त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर आता या प्रकरणी भाजप नेते निलेश राणे यांनी भूमिका मांडली आहे.
राणे म्हणाले, ‘सुषमा अंधारे ज्या पद्धतीने बोलतात जसे की त्या दोन-तीन टर्म निवडणुका लढल्या आहेत. त्या कधी मंत्री होत्या का ? त्यामुळे हा कॉन्फिडन्स त्यांच्यात नेमका कुठून आला ? हेच कळत नाही. केज न्यायालयात सन 2020 मधील एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी ते बीडमध्ये आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
‘अंधारे ताईंनी देखील मर्यादा पाळल्या पाहिजेत. तुमचा अधिकार काय ? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर बोलता, पण कोणत्या अधिकाराने बोलता असा सवाल त्यांनी केला.
पुण्याचा, महाराष्ट्राचा विकास हरपला… Narendra Modi यांच्याकडून बापटांना श्रद्धांजली!
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबाबतीत केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडताना दिसत आहे. या प्रकरणात आता थेट महिला आयोगाने उडी घेतली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. सदर प्रकरणी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी तसेच या कार्यवाहीचा अहवाल 48 तासांत सादर करावा असे निर्देश आयोगाने दिले आहेत.
Girish Bapat : राज्याने एक अनुभवी संसदपटू गमावला, बापटांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख
आमदार संजय शिरसाट यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सुषमा अंधारे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे जोरदार पडसाद आज दिवसभर उमटत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिरसाट यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.
आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर आंदोलनही केले. त्यानंतर सुषमा अंधारे यांनीही पत्रकार परिषद घेत शिरसाट यांच्याविरुद्ध अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले. तसेच महिला आयोगाकडेही तक्रार केल्याचे त्यांनी म्हटले होते. या सगळ्या घडामोडींनंतर महिला आयोगही आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
शिरसाटांचा पाय आणखी खोलात ! महिला आयोगाने पोलीस आयुक्तांना धाडले पत्र
संजय राऊत रिकामटेकडा माणूस
राणे यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत रिकामटेकडे आहेत, त्यांना दुसरे काहीच काम नाही. महाराष्ट्रात त्यांची किंमत काय ? पत्राचाळ प्रकरणात ते आरोपी आहेत, अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.