Download App

‘उद्धव ठाकरेंना ‘अल्झायमर’, न्यूरो सर्जनकडून उपचार घ्या’; वाढदिवशीच बावनकुळेंचा खोचक टोला

Chandrashekhar Baqankule criticized Uddhav Thackeray : शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच खोचक ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

‘उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षात अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षात काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण, 2019 च्या निवडणुकीत मोदीजींच्या कर्तुत्वावर तुम्ही शेकडो भाषणं केली आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनल भेटून उपचार घ्या. म्हणजे, नरेंद्र मोदींवर केलेली भाषणं तुम्हाला आठवतील’, असा टोला बावनकुळेंनी लगावला. ‘महायुतीच्या जागा वाटपाची चिंता तुम्ही करू नका, तुमची शिल्लक सेना तरी निवडणुकीपर्यंत तुमच्यासोबत राहते का, त्याकडे लक्ष द्या.’

आत्मनिर्भर भारतासाठी महायुती

‘आत्मनिर्भर भारतासाठी महायुती झाली आहे. तर तुमची महाविकास आघाडी सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी झाली. तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी 5 दावेदार बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात तुम्हीही बोहल्यावर बसण्यासाठी उत्सुक आहात. पण, 2024 साली जनता तुम्हाला तुमच्या आवडीचं घरी बसण्याचं काम देणार आहे.’

’30 वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली आणि मुंबईतील मराठी माणसाला विकासापासून दूर ठेवलं ते उद्धव ठाकरे आज मुंबईची चिंता करत आहेत. मुंबईवरील तुमचं बेगडी प्रेम ऊतू जात आहे. मुंबई तोडणार असं सांगून तुम्ही मुंबईकरांची दिशाभूल करत आहात. मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडणार नाही. पण, येत्या निवडणुकीत तुमच्या भ्रष्ट कारभारातून मात्र मुंबई नक्की मुक्त होईल’, असे ट्विट बावनकुळे यांनी केलं आहे.

Assembly Session : आमदार कांदे ब्लॅकमेलिंग प्रकरण गाजलं! फडणवीसांकडून चौकशीसाठी सहपोलिस आयुक्ताची नियुक्ती…

 

Tags

follow us