Download App

अजितदादांनी बंड केलं पण, पडद्यामागं काय शिजलं? चव्हाणांनी केला धक्कादायक खुलासा

Maharashtra Politics : जोपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी तुटत नाही तोपर्यंत येथील कोणत्याच निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत भाजपात नव्हती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीड वर्षांपासून रखडल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीत अंतर्गत वाद सुरू होते त्यातून काहीतरी घडेल अशी चिन्हे दिसत होती. वाटाघाटी आणि अन्य बाबतीत अजित पवार (Ajit Pawar) थेट अमित शहांबरोबर चर्चा करत होते. प्रफुल्ल पटेलही त्यामध्ये होते, असा खळबळजनक खुलासा काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला.

तोंड सांभाळून बोला, नाहीतर तुमचे कपडे फाडू; लाड यांचा खासदार सावंतांना इशारा

एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडात पडद्यामागे काय घडलं याचा खुलासा केला. ते पुढे म्हणाले, अजित पवार यांचं पहिल्यापासून म्हणणं होतं की मला मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे. मला जर मुख्यमंत्री केलं तर राष्ट्रवादीचे सगळे आमदार बरोबर येतील. त्यानंतर आम्ही तिघे मिळून तुमच्या हातात महाराष्ट्र देतो, असे त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना सांगितले होते.

दुसऱ्या बाजूला भाजपचे जे जुने नेते होते ते अजित पवारांना स्वीकारायला आजिबात तयार नव्हते. आरएसएस तसेच नितीन गडकरींचा गटही यासाठी तयार नव्हता. नाराजी होती. पण ते केलं गेलं.

शिंदेंचे महत्व आता संपले

चव्हाण म्हणाले, माझी अशी माहिती आहे की 10 ऑगस्टच्या आधी विधानसभा अध्यक्षांना एकनाथ शिंदे यांच्या केसवर निकाल द्यावा लागेल. कदाचित भाजपनं हे शिंदेंनी सांगितलंही असावं. तसेच शिंदेंच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकांना सामोरे जावं असं भाजपलाही वाटत नाही. त्यांची उपयुक्तता आता संपली आहे. त्यांचा प्रभाव फक्त ठाण्यापुरता आहे. उलट नकारात्मकताच जास्त आहे.

महाविकास आघाडीला फटका बसलाच 

अजित पवार यांच्या बंडाने महाविकास आघाडीला निश्चितच फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत आघाडीची ताकद आता कमी झाली आहे. या भागातीलच आमदार अजितदादांबरोबर मोठ्या संख्येने गेले आहेत. त्यामुळे आगामी काळात या गोष्टीचा विचार करून महाविकास आघाडीला रणनिती ठरवावी लागणार आहे.

Tags

follow us