तोंड सांभाळून बोला, नाहीतर तुमचे कपडे फाडू; लाड यांचा खासदार सावंतांना इशारा

तोंड सांभाळून बोला, नाहीतर तुमचे कपडे फाडू;  लाड यांचा खासदार सावंतांना इशारा

Prasad Lad : राष्ट्रवादीतील बंडानंतर कालपासून शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली. त्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजपासून दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यासाठी घराबाहेर पडले. पोहरादेवीच्या दर्शनाने ते महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करत आहेत. दरम्यान, त्यांच्या याच दौऱ्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाहीत, मात्र आता ते बाहेर फिरत आहेत, त्यामुळे हा दौरा एक नौटंकी असल्याची टीका केली. त्यावर खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी बावनकुळे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. सावंत यांच्या टीकेवरून आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना थेट इशारा दिला. (Prasad Lads warning to shivsena MP Arvind Sawant Over Chandrashehar Bawankule)

चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे नौटंकी असल्याची टीका केल्यानंतर अरविंद सावंत यांनी त्यांचा जोरदार समाचार घेतला. चंद्रशेखर बावनकुळे हे बावनकुळे नसून ‘खुळे’ आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यावर आता प्रसाद लाड यांनी अरविंद सावंत यांना फटकारलं. ते म्हणाले, काल परवापर्यंत घरी बसलेले, झोपी गेलेले आता जागे झाले आहेत आणि दौऱ्यावर निघाले आहेत. त्यात उकळत्या पाण्याला खळखळाट फार अशी स्थिती अरविंद सावंत यांची झालीआहे.

तोंड सांभाळून बोला, नाहीतर तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही; लाड यांचा खासदार सावंतांना इशारा 

ते म्हणाले, तुमचा बॉस नावाचा पोपट मरायला लागला आहे. म्हणून घराबाहेर आला आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री असतांना घरातून कधी बाहेर पडले नाहीत की, जनतेला भेटले नाहीत. मानेला पट्टे लावून फिरलात. आता तुम्ही म्हणता की, बावनकुळे खुळे आहेत. माझी नम्र विनंती आहे की महाराष्ट्रातील भाजपचे नेतृत्व बावनकुळे यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला. अरविंद सावंत साहेब, आता मी तुम्हाला साहेब म्हणतोय. पण पुन्हा अशी चूक केल्यास आम्ही तुमचा एकेरी उल्लेख करून तुमचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाही,’ असं इशारा लाड यांनी दिली.

बावनकुळेंचं ट्टिट काय?

सत्तेत असताना अडीच वर्षात अडीच दिवसही मंत्रालयात जायला वेळ न मिळालेले उद्धव ठाकरे आता दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. उद्धव ठाकरेंना विदर्भातील जनतेची कधी आठवण झाली नाही, आता मात्र, विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय. सत्ता गेल्यामुळं सुरू झालेली नौटंकी जनता ओळखून आहे, असं ट्विट करत त्यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube