Download App

Dasara Melava LIVE : महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचे नाही – ठाकरे

  • Written By: Last Updated:

Dasara Melava LIVE : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, आज (दि.12) राज्यात राजकीय दसरा मेळाव्यांचे सोने लुटले जाणार आहे. नारायण गडावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा, तर, भगवान गडावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) तर, दुसरीकडे संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. या सर्व राजकीय दसरा मेळाव्याचा रिअल टाईम अपडेट देणार लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग…

LIVE NEWS & UPDATES

  • 12 Oct 2024 09:04 PM (IST)

    शिंदेला गोळी मारणं योग्यच पण...

    उपस्थितांना संबोधित करताना ठाकरेंनी बदलापूर अत्याचार प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, नराधम शिंदेला गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या. आनंद दिघे जर असते तर, त्यांनी देखील या पापासाठी शिंदेला गोळी घातलीच असती. महिलांवर अत्याचार करणाऱ्या शिंदेला गोळी घातली ते बरचं झालं. शिंदेला गोळी घातली याचं दुःख नाहीये त्याला मारायलाच पाहिजे होता पण, शिंदेला मरल्यानंतर जसं आपल्या मराठीत म्हणतात की, म्हातारी मेली त्याचं दुःख नाहीये पण काळ सोकावतोय असे ठाकरे म्हणाले. शिंदेला गोळी घातली कारण या प्रकरणात ज्यांचा सहबाग होता त्या सर्वांना वाचवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तुम्ही शिंदेला गोळी घातली असेल. त्यामुळे या गोष्टीचादेखील उलगडा झाला पाहिजे. महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगयच्या लायकीचे नाही असेही ठाकरे म्हणाले.

  • 12 Oct 2024 08:54 PM (IST)

    चंद्रचूडसाहेब तुम्हाला ऐतिहासिक संधी - ठाकरे

    शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर याबाबत सर्वोच्च न्याायालयात केस दाखल करण्यात आली आहे. यावर बोलताना ठाकरेंनी सरन्यायाधीशांना उद्देशून आवाहन केले आहे. ते म्हणाले की, चंद्रचूडसाहेब तुम्हाला ऐतिहासिक संधी असून, आम्हाला न्याय देण्याची मागणी ठाकरेंनी केली आहे. तीन सरन्यायधीश येऊन गेले तरी, या ऐतिहासिक केसचा निकाल लागू शकलेला नाही.

  • 12 Oct 2024 08:37 PM (IST)

    प्रत्येक जिल्ह्यात छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभारणार; ठाकरेंची मोठी घोषणा

    आपलं सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभारणार असल्याची मोठी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. ते म्हणाले की, ते आमचे दैवत असून होय आम्ही आमच्या देवऱ्यातही छ.शिवाजी महाराजांची पूजा करणार. जसे आम्ही जय श्रीराम म्हणतो तसं आम्ही जय शिवराय त्याच किंवा त्याहून मोठ्या आवाजात जय शिवराय म्हणणार असे ठाकरे म्हणाले. जय शिवराय हा तर माझ्या महाराष्ट्राचा मंत्र असल्याचेही ते म्हणाले.

    माझी तर अशी इच्छा आहे की, छ. शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशात सर्वप्रथम आरबार उभं केलं म्हणून ते आयएनएस शिवाजी वगैरे ते आल्याचे ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हात मी छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभारीनचं पण, आपल्या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभे राहिले पाहिजे. मंदीर केवळ मंत्रोच्चारासाठी नाही तर, त्यांच्या आयुष्यातील जे काही प्रसंग आहेत ज्याला पुरावे आहेत हे सगळे प्रसंग त्या मंदीरात आणि मंदिराच्या आजूबाजूला शिवचरित्र निमित्ताने किंवा त्यादृष्टीने कोरले जातील किंवा दाखवले जातील.

  • 12 Oct 2024 08:25 PM (IST)

    कितीही पिढ्या येऊ देत, त्यांच्या उरावर बसून भगवा फडकवणार

    भाजप वाढवणं हे आमचे पाप आहे. आम्ही यांना डोक्यावर बसवलं पण आता मला भाजपला खांदा द्यायचा आहे. असे म्हणत आपल्याला उखडून फेकण्यासाठी कितीही पिढ्या येऊ देत, या सर्वांच्या उरावर बसून मी भगवा फडकवणार आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आगामी काळात होणाऱ्या विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. मला संघाबद्दल आदर आहे, भागवतांबद्दल आदर आहे, पण ते जे काही करत आहेत त्याचा आदर नाही असेही ठाकरे म्हणाले. विरोधकांकडून मला रोज मला शिव्या दिल्या जात आहेत, पण तुमचे आशीर्वाद आहेत तोवर माझा कोणी बाल ही बाका करू शकणार नाही. तुमचं पाठबळ नसतं तर मी उभा राहू शकलो नसतो. हे ऋण या जन्मी फेडता येणार नाही असेही ठाकरे उपस्थितांना म्हणाले.

  • 12 Oct 2024 08:12 PM (IST)

    मोदी-शाहंना शिव्या देऊन मिळलेली मते तुम्हाला लखलाभ - शिंदे

    महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेली मते ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शिव्या देऊन मिळालेली आहे. ती तुम्हालाचा लखलाभ राहू दे. जर, राज्यात सत्तांत्तर झालं नसतं तर, लाखो कोटींचे प्रकल्प थांबले असते. कल्याणकारी योजना थांबल्या असत्या. लाडक्या बहिणींची योजना आली नसती असे शिंदे म्हणाले. माझी दाढी यांना खुपते, पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

  • 12 Oct 2024 07:52 PM (IST)

    घासून नाही ठासून 2 वर्षे पूर्ण केली- मुख्यमंत्री शिंदे

    घासून नाही ठासून 2 वर्षे पूर्ण केली आहेत, मला हलक्यात घेऊ नका असे म्हणत शिंदेंनी पहिला बाण सोडला आहे. गर्व से कहो हम हिंदू आहे ही घोषणा बाळासाहेबांनी देशाला दिली. पण काहींना हिंदू या शब्दाची लाज वाटू लागली आहे. हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना आता लाज वाटत असल्याची टीका शिंदेंनी ठाकरेंचे नाव न घेता केली. मात्र, आपण अशा लोकांपासून शिवसेना मुक्त केली, आणि अशाच आझाद सेनेचा हा आझाद मेळावा असल्याचे शिंदे म्हणाले.

  • 12 Oct 2024 07:32 PM (IST)

    हे साल महत्त्वाचे, ही लढाई महत्त्वाची - आदित्य ठाकरे

    पहिल्यांदाच दसरा मेळाव्याला संबोधित करतोय. दसऱ्याला काय तर आज्याचं भाषण नंतर वडिलांचे भाषण ऐकायला. बाळासाहेबांनी बळ दिलं आणि तलवार दिली आणि युवासेना इथेच उभी केली. 14 वर्षात मी भाषण केलं नाही . मात्र उद्धव साहेब आले की मी थांबणार आहे . हे साल महत्त्वाचे, ही लढाई महत्त्वाची असे म्हणत महिनाभरात आपलं सरकार येत आहे अशी गर्जना आदित्य ठाकरेंनी केली. आपलं सरकार आल्यावर प्रत्येकाची फाईल बाहेर काढली जाणार असून, अधिकारी असो किंवा राजकारणी ‌ज्यांनी लूट केली त्यांना आत‌ ‌टाकणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे.  हा महाराष्ट्र तुम्हाला शिक्षा देणार घरी तरी बसविणार किंवा जेलमध्ये तरी बसविणार असे म्हणत आदित्य ठाकरेंनी युनिफॉर्म, झाडांमध्ये घोटाळा, सॅनेटरी पॅड वेंडिग मशीन घोटाळा, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात घोटाळा अशा घोटाळ्यांचा पाढाच वाचला.

  • 12 Oct 2024 07:07 PM (IST)

    लाडकी बहिणींनो 1500 रुपये कचकून घ्या - अंधारे

    अंधारेंनी भाषणावेळी राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून जोरदार हल्लाबोल करत लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, लाडक्या बहिणांनी 1500 रुपये कचकून घेतले पाहिजे, हे पैसे काही फडणवीसांनी नागपूरचा बंगला विकून किंवा मुख्यमंत्र्यांनी तापोळ्याची जमीन विकून दिले नाही. ते सरकारचे पैसे आहे. तुम्ही पोस्टमन आहात. त्याचे मोक्कार क्रेडिट घ्याचे नाही.

  • 12 Oct 2024 06:54 PM (IST)

    सरसंघचालक मोहन भागवत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला द्यावा - सुषमा अंधारे

    आम्हाला हा महाराष्ट्र शांत हवा आहे. सांप्रदायिक विभाजन नको आहे. पण फडणवीसांनी राज्यात द्वेषाचे राजकारण केले. त्यामुळे सरसंघचालकांनी देवेंद्र फडणवीसांना सल्ला द्यावा अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. फडणवीसांनी माणसातला माणूस ठेवला नाही असेही अंधारे म्हणाल्या. फडणवीस म्हणजे फेक नरेटिव्हचं महाकेंद्र आहे. कोकणमध्ये न चालणारी चिल्लर राज्यात सभा घेत आहे. यामुळे द्वेश पसरत आहे. चाराणे बाराणे हिंदु मुस्लिम वाद लावतात. पण‌ त्याला राज्यातली‌ जनता बधली ‌नाही असे अंधारे म्हणाल्या.

  • 12 Oct 2024 06:43 PM (IST)

    शिवाजी पार्कवर भाषणाला सुरूवात

    ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी अनेक नेत्यांचं आगमन होण्यास सुरूवात झाली असून, उद्धव ठाकरेदेखील थोड्याचवेळात शिवाजी पार्कवर दाखल होणार आहेत. त्याआधी दाखल झालेल्या नेत्यांच्या भाषणास सुरूवात झाली आहे.

     

follow us