Maharashtra Politics : निश्चिंत राहा! आम्ही सर्व कायदेशीर केलंय; काही तासातचं…

Devendra Fadanvis On Maharashtra Political Crises :  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये यावर निर्णय लागेले अशी शक्यता वर्तवली जात असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान करत काहींना सल्लादेखील दिला आहे. ते वर्धा येथे पत्रकारांशी बोलत होते. LIVE | Media interaction in #Wardha https://t.co/3SaJb6nyd4 — Devendra Fadnavis […]

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Devendra Fadanvis On Maharashtra Political Crises :  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये यावर निर्णय लागेले अशी शक्यता वर्तवली जात असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान करत काहींना सल्लादेखील दिला आहे. ते वर्धा येथे पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले फडणवीस?

“सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच महाराष्ट्रातल्या काही राजकीय पंडित आणि काही पत्रकार यांनी निर्णय देऊन टाकला आहे. पुढचे कॉम्बिनेशनही करुन टाकले. सरकारंही तयार करून टाकली. मला असं वाटतं की हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय हे खूप मोठं न्यायालय आहे. शांतपणे निर्णयाची वाट बघावी. आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत. काहीही होणार नाही. आम्ही जे काही केलं आहे ते सगळं कायदेशीर आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे.”

Sanjay Raut : ‘मी कुठे म्हणतो सामनाला…’ राऊत-पवारांमधील टीकेचा सिलसिला सुरूच

‘अध्यक्षांचा निर्णय चुकला तरच कोर्ट हस्तक्षेप करतं’

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर राहिलेला असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पुन्हा एकदा अतिमहत्त्वाचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा नव्या चर्चांना सुरूवात झाली आहे. अध्यक्षांचा निर्णय चुकला तरच कोर्ट हस्तक्षेप करतं असे महत्त्वाचे विधान नार्वेकरांनी केले आहे. सध्याच्या सरकारने आपण अध्यक्ष असताना अधिवेशनात विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलं आहे. माझ्यासमोरच्या आकड्यांवरून हे सरकार धोक्यात नाही असेही ते म्हणाले.

कधी लागणार निकाल?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी पार पडली आहे. यासंदर्भातला निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. या प्रकरणावर  ज्या खंडपीठातील सुनावणी पार पडली त्यातील एक न्यायमूर्ती येत्या १६ तारखेला निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या आधीच या खटल्याचा निकाल लागणं अपेक्षित आहे. १३ आणि १४ तारखेला शनिवार-रविवार असल्यामुळे ११ किंवा १२ मे रोजीच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता न्यायालय नेमकं काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष आता लागून राहिले आहे.

Exit mobile version