Download App

‘आम्ही निवडणुका घेणारच, तुम्हाला पाडणारच’; फडणवीसांनी आघाडीला ठणकावले !

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडला. या सभेत आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार निवडणुका घ्यायला का घाबरत आहे असा सवाल उपस्थित करत हिंमत असेल तर सरकारने निवडणुका घ्याव्यात, असे आव्हानही सरकारला दिले होते. या आव्हानाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आघाडीच्या कालच्या सभेवर टीका करताना ते म्हणाले, कालची सभा ही निराश लोकांचं अरण्यरुदन आहे. त्यांची सत्ता गेल्याने ते निराश आहेत. बावचळलेले देखील आहेत. आणि तोल गेलेले देखील आहेत. त्यामुळे अशा लोकांनी काही बोलल्यावर ते किती गंभीरपणे घ्यावे याचा विचार आपण केला पाहिजे. त्यांना फक्त टीका करायची आहे. ते अडीच वर्षे सत्तेत असताना एकही विकासाचे काम करू शकले नाहीत. आताही ते फक्त टीकाच करत आहेत. आम्हाला मात्र विकासच करायचा आहे.

घोटाळा करुन सत्तेत आलेले बोलताना घोटाळा करतात; अजित दादांचा एकनाथ शिंदेंना टोला

एक रुपयात दवाखाना सुरू करण्याचे युपीए सरकारने म्हटले होते. अडीच वर्षात एकही सुरू केला नाही. आम्ही मात्र साडेतीनशे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे. त्यामुळे हे फक्त तोंडाची वाफ दवडणारे लोक आहेत लोकांचे यांना काहीच देणेघेणे नाही.

निवडणुका आम्ही योग्य वेळी घेणारच आहोत आणि तुम्हाला पाडणारच आहोत. निवडणुका घेऊन दाखवा म्हणता, निवडणुका काय रोज होतात का ?, हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे निवडणुका योग्य वेळी होतील आणि आम्ही त्यांना चारीमुंड्या चीत करू, अशा शब्दांत फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठणकावले.

Sharad Pawar : आज‘लोक माझे सांगाती’चा पार्ट 2 येणार; काय नवे खुलासे समोर येणार? उत्सुकता शिगेला

होय मी बाबरी पडत तेव्हा तिथेच होतो

मी असं म्हटलं होतं की ज्यावेळी बाबरी पडत होती त्यावेळी ते कुठे होते. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बाबरी पडत होती त्यावेळी तिथे होतो. हजारो कार्यकर्ते माझ्याबरोबर तिथे होते. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शिवसेनेचा एक तरी कार्यकर्ता दाखवावा. उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगावे की ते कुठे होते. ते मुंबईच्या बाहेरही पडले नाहीत. आम्ही जाऊन लढलो आहोत.

Tags

follow us