खळबळजनक! भाजप नेते किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल…

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतला व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राजकीय नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत थेट पत्रकार परिषदेतच आरोप करणारे किरीट सोमय्या हे आता या व्हिडिओमुळे अडचणीत आले आहेत. एका वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रसारित केले आहे. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक होत असून, या प्रकरणाची चौकशी करण्यची मागणी केली आहे. बंडानंतर पुढे […]

Untitled Design   2023 07 17T212621.396

kirit sommyya

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतला व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राजकीय नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत थेट पत्रकार परिषदेतच आरोप करणारे किरीट सोमय्या हे आता या व्हिडिओमुळे अडचणीत आले आहेत. एका वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रसारित केले आहे. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक होत असून, या प्रकरणाची चौकशी करण्यची मागणी केली आहे.

बंडानंतर पुढे अजितदादांची काय रणनीती? प्रकाश आंबेडकरांनी केलं भाकीत…

व्हिडिओमध्ये नेमकं काय?
भाजपचे नेते किरीट सोमय्या एका हॉटेलच्या रुममध्ये असल्याचं दिसून येत आहेत. त्यांच्यासोबत एक महिलाही दिसून येत आहे. विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत.
Anupam Kher: ‘फक्त टक्कल असलेली व्यक्ती…’; अनुपम खेर यांच्या पोस्टमुळे रंगली चर्चा

किरीट सोमय्यांसारख्या बड्या राजकीय नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच यावर वेगवेगळ्या चर्चाही होत आहेत. हा व्हिडिओ ब्लर स्वरुपात एका वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आला आहे. त्यातील महिला कोण? याबाबत माहिती समोर आलेली नाही. परंतु या प्रकरणात विरोधकांकडून आता सोमय्यांना घेरण्यात येत आहे.

विधानसभेत ऐतिहासिक क्षण! विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची रिकामी तर माजी सहा चेहरे सत्ताधारी बाकावर

काँग्रेस नेते अतुल लोंढे म्हणाले : सार्वजनिक जीवनात असणाऱ्या लोकांचे व्हिडिओ आक्षेपार्ह असेल तर त्याची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे. विशेष करून किरीट सोमय्या हे भाजपचे बडे नेते आहेत. अशा व्यक्तीचा व्हिडिओ जर समोर आला असेल तर समाजात ही बाब मोठी धक्कादायक आहे. जी व्यक्ती कायम लोकांची पोलखोल करत असते. भ्रष्टाचार विरोधीपणाचा आव आणून लढत असते. त्यामुळे यातील सत्यता काय आहे हे तपासणे गरजेचे आहे.

विठ्ठला, संभाळून घे रे आम्हाला…; भेटीला गेल्यावर भुजबळांनी थेट पवारांचे पायच धरले!

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या विद्या चव्हाण :
हा व्हिडिओ काय आहे, याची मला अजिबात माहिती नाही. पण तुम्ही म्हणत असाल की, तो व्हिडिओ आक्षेपार्ह असेल तर त्याची शहानिशा झाली पाहिजे, त्यांना कोणी फसवत तर नाही ना, या सर्व बाजूंची चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, विरोधकांवर थेट पुराव्यानिशी आरोप करण्याची सोमय्यांची स्टाईल महाराष्ट्राला अवगत आहे. त्यांच्याकडे अनेक नेत्यांची गोपनीय माहिती असते. त्यांच्याकडून सातत्याने नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, आता अशा नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल चढवला जात आहे.

Exit mobile version